Bachchu Kadu : नवनीत राणांचा पराभव रवी राणाच करतील; बच्चू कडू 'असं' का म्हणाले?

Navneet Rana : रवी राणांनी किमान दोन वर्षे तोंड बंद ठेवले असते तर आज चित्र वेगळे असते. त्यातून आजचे रिझल्ट वेगळे राहिले असते.
Bachchu Kadu, Navneet Rana
Bachchu Kadu, Navneet RanaSarkarnama

Amravati Political News : लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीला अमरावती मतदारसंघात महायुतीत पडलेली वादाची ठिणगी अद्यापही शमताना दिसत नाही. भाजपच्या उमेदवार नवनीत राणा, त्यांचे पती रवी राणा यांच्याविरुद्ध शिंदे गटाचे नेते आनंद आडसूळ आणि प्रहारचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातील वाद मतदानानंतरही वाढतच असल्याचे दिसून येत आहे. अमरावतीतून महायुतीला फटका बसत असून महाविकास आघाडी पुढे असल्याचा दावा आडसुळांनी केला होता. त्यानंतर कडू यांनी थेट नवनीत राणांचा पराभव होणार असल्याचे विधान केल्याने हा वाद चिघळत चालल्याचे बोलले जात आहे. Bachchu Kadu

लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात महायुतीत घमासान पाहायला मिळाले. यात अमरावती लोकसभा मतदारसंघाची सर्वात मोठी चर्चा झाली. महायुतीत सिटिंग खासदार या नियमानुसार उमेदवारी जाहीर करण्याचा पहिला नियम होता. तसेच भाजपने केलेल्या सर्वेक्षणानुसारही काही ठिकाणी उमेदवारांची निवड करण्यात आली. अपक्ष खासदार असलेल्या नवनीत राणांनी Navneet Rana ऐन निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून मित्र पक्ष शिंदे गट आणि प्रहार संघटना आक्रमक झाली. माजी खासदार आनंद आडसूळ आणि आमदार बच्चू कडू यांनी राणांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध केला.

बच्चू कडू Bachuchu Kadu म्हणाले, या निवडणुकीत नवनीत राणा या हरणार आहेत. सट्टा बाजारात कुणाचाही भाव असून द्या, बाजी आम्हीच मारणार आहोत. लहान मुलांना विचारले तरी ते सांगतील की नवनीत राणा यंदा पडणार आहेत. त्यांना रवी राणाच पाडणार आहेत. त्यांचा पराभव रवी राणाच करणार आहे. रवी राणांनी किमान दोन वर्षे तोंड बंद ठेवले असते तर आज चित्र वेगळे असते. त्यातून आजचे रिझल्ट वेगळे राहिले असते, असे स्पष्ट मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.

Bachchu Kadu, Navneet Rana
Gajanan Kirtikar News : गजानन कीर्तीकर घरवापसीच्या तयारीत? दोन्ही शिवसेनेत नेमके काय सुरू...

दरम्यान, गेल्या दोन वर्षांत राणा दाम्पत्याने महायुतीतील मित्र पक्षातील नेत्यांना वारंवार डिवचण्याचे प्रकार केले आहेत. रवी राणांनी उघडपणे माजी खासदार आनंद आडसूळ, आमदार बच्चू कडू यांना लक्ष्य केले होते. त्याचा वाचपा लोकसभा निवडणुकीत संबंधित नेत्यांनी काढल्याची चर्चा आहे. यातूनच कडू यांनी रवी राणा हेच नवनीत राणा यांच्या पराभवास कारणीभूत ठरतील, असे सूचक विधान केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या निवडणुकीत नवनीत राणांना विरोध करत बच्चू कडू यांनी प्रहारच्या वतीने दिनेश बूब यांना उमेदवारी दिली होती. त्यातून राणांची यांना मिळणारी मते फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आनंद आडसूळ Anand Adsul यांनीही राणांना मदत केली नसल्याचे बोलले जाते.

(Edited by Sunil Dhumal)

Bachchu Kadu, Navneet Rana
Loksabha Election : अमित शाहांनी पाच टप्प्यातील मतदानानंतर मोदींना मिळालेल्या जागांचा थेट आकडाच सांगितला, म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com