Udhav Thackeray, Shambhuraj Desai sarkarnama
विदर्भ

Shambhuraj Desai :"आम्ही काम करतो, हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न"

Shambhuraj Desai on Girish Mahajan : मंत्र्यांना नाहक आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका!

संपत देवगिरे ः सरकारनामा

Maharashtra Assembly session 2023 : सभागृहात मंत्री गिरीश महाजन यांच्या बाबत झालेली चर्चा एकतर्फी आहे. त्यात राज्य सरकार तसेच मंत्र्यांना नाहक आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंना दाखविण्यासाठी हा विरोधकांनी केविलवाना प्रयत्न असल्याचे सांगत गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी सोमवारी विरोधकांचा समाचार घेतला.

मुंबई बाँम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीमच्या नातेवाईकाच्या लग्नात मंत्री महाजन यांनी हजेरी लावल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. यावरून सभागृहात झालेल्या गोंधळा झाला. त्यानंतर सभागृह तहकुब करण्यात आले. यानंतर विधान परिषदेचे कामकाज पुन्हा सुरू झाले. तेव्हा देसाई यांनी या विषयावर शासनाची भूमिका स्पष्ट करत निवेदन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

देसाई म्हणाले, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ही चर्चा फेटाळली असली तरीही ती प्रसारमाध्यमांत ते गेली आहे. सभागृहात चर्चा करताना त्याची आधी सुचना देणे आवश्यक आहे. हे तारतम्य देखील विरोधकांनी पाळले गेले नाही.

ज्या प्रकरणाचा उलेख झाला, तो प्रसंग एका लग्न समारंभाचा आहे. ज्यावेळी एखाद्या लोकप्रतिनिधीला निमंत्रण मिळते, तेव्हा अशा लग्न समारंभाला आम्ही जात असतो. त्याबाबत एखादे छायाचित्र दाखवून त्यावर आरोप करणे योग्य नाही. आज बऱ्याच दिवसांनी या सभागृहात पक्षाचे नेते आले असल्यामुळे आपल्या नेत्याला दिसावं, आम्ही काय काम करतो, हा केविलवाना प्रयत्न उद्धव ठाकरे गटांकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणाबाबत यापूर्वीच एसआयटीची चौकशी सुरू झालेली आहे, यामध्ये सर्वांची चौकशी होणारच आहे. चौकशीत दूध का दूध, पाणी का पाणी होईल. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनीही यावर विरोधकांचा समाचार घेतला.

(Edited by- sudesh mitkar )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT