Nagpur Blast : नऊ कामगारांच्या मृत्यूनंतर 'हे' तीन मंत्री फिरकलेदेखील नाहीत...

Nine workers died in a blast at a solar explosive company : सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात सहा महिलांसह नऊ कामगारांचा मृत्यू
Uday Samant, Mangal Prabhat Lodha, Suresh Khade
Uday Samant, Mangal Prabhat Lodha, Suresh KhadeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत रविवारी (ता. 17) सकाळी झालेल्या भीषण स्फोटात ९ कामगारांचा मृत्यू झाला. नागपूर हिवाळी अधिवेशन काळात झालेल्या या स्फोटानंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी भेट देत सांत्वन केले. पण, ज्यांच्याकडे महिला व बालविकास, उद्योगाचा आणि कामगारांचा भार आहे. असे तिन्ही मंत्री तिकडे फिरकलेदेखील नाहीत. त्यामुळे वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नागपूर येथे सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत रविवारी झालेल्या स्फोटात सहा महिलांसह नऊ कामगारांचा मृत्यू झाला. राज्य सरकारने पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली. तसेच घटनास्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट दिली. असे असताना उद्योगमंत्री उदय सामंत, कामगार व महिला व बाल विकासमंत्री मंगल प्रभात लोढा आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी घटनास्थळी भेट देण्याची गरज होती. पण, या तीन मंत्र्यांना वेळ का मिळाला नाही, अशी विचारणा आता होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uday Samant, Mangal Prabhat Lodha, Suresh Khade
Girish Mahajan :"फसवणूक करायची नाही, ठराव करून आरक्षण मिळणार नाही"

नागपूरमधील या अपघाताने संपूर्ण कामगार तसेच उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ते निवळण्याची गरज आहे. सुरक्षेच्या योग्य उपाययोजना केल्या असत्या तर हा अपघात झाला नसता. इतर ही उद्योगात सुरक्षा मापदंड पाळले जातात की नाही, याचीही विभागनिहाय खातरजमा करण्याची गरज आहे.

औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकार्‍यांचा यात निष्काळजीपणा होता काय, याची तपासणी झाली पाहिजे. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देताना भविष्यात अशा औद्योगिक दुर्घटना होऊ नयेत, यासाठी सरकारला पुढाकार घ्यावा लागेल. त्याचबरोबर अधिवेशनकाळात मंत्र्यांना संवेदनशीलतेचा परिचय करून द्यावा लागेल.

(Edited by- Sudesh Mitkar )

Uday Samant, Mangal Prabhat Lodha, Suresh Khade
Ramnath Kovind News : 'वन नेशन, वन इलेक्शन' संकल्पनेवर माजी राष्ट्रपती करणार सर्व पक्षांशी चर्चा...  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com