Chandrakant Patil On Reservation
Chandrakant Patil On ReservationSarkarnama

Chandrakant Patil : 'पद मिरवण्यासाठी की...', चंद्रकांत पाटलांनी कोणती समज दिली?

Bjp Political News : चंद्रकांत पाटील म्हणाले, पक्षाचे पद म्हणजे जबाबदारी...
Published on

Pune News : राजकीय पक्षात पद मिळाले की त्याचा फायदा उठवून त्या माध्यमातून आपल्या हिताची कामे केली जातात. पद हे घेऊन मिरविण्यासाठीच असते असा समज बहुतांश कार्यकर्त्यांचा असतो. मात्र, भाजपचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या समजाला सुरुंग लावला आहे. भारतीय जनता पक्षाचे पद मिळणे म्हणजे एक जबाबदारी आणि अपेक्षा आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने त्या जबाबदारी आणि अपेक्षा पूर्ण कराव्यात, असे पाटील यांनी सांगितले.

राजकीय पक्षात काम करताना कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदे दिले जातात. आपण मोठे कोणीतरी झालो असे पद मिळाल्यानंतर वाटण्यास सुरुवात होते. मिळालेल्या पदाचा वापर करून 'आर्थिक हित ' साधण्याचा प्रयत्न केला जातो. राजकीय पक्षाकडून मिळालेल्या पदांचा गैरवापर करून मनमानी कारभार केला जात असल्याचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. मिळालेले पद म्हणजे स्वतःचा फायदा नव्हे तर एक जबाबदारी आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Chandrakant Patil On Reservation
Ramnath Kovind News : 'वन नेशन, वन इलेक्शन' संकल्पनेवर माजी राष्ट्रपती करणार सर्व पक्षांशी चर्चा...  

त्याचा वापर समाजातील विविध घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करणे गरजेचे असल्याचे अनेक नेत्यांकडून वारंवार सांगितले जाते. पक्षाचे पद मिळाले म्हणून त्याचा उपयोग आपल्या फायद्यासाठी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सूचक शब्दांत कान टोचले आहेत.

पाटील म्हणाले, पद मिळालेल्या व्यक्तीने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे. संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करणे ही पक्षाची रास्त अपेक्षा असते. त्यामुळे कार्यकर्त्यांनीदेखील ही जबाबदारी आणि अपेक्षा योग्य पद्धतीने पार पाडाव्यात. त्यासाठी आवश्यक असलेली संपूर्ण मदत पक्षाकडून दिली जाईल. भारतीय जनता पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम पाटील यांच्या उपस्थितीत झाला. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उपाध्यक्ष माधव भंडारी, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, शहर महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, यांच्यासह डॉ. संदीप बुटाला, सचिन पाषाणकर, गणेश वर्पे, सुशील मेंगडे यावेळी उपस्थित होते.

Chandrakant Patil On Reservation
Girish Mahajan :"फसवणूक करायची नाही, ठराव करून आरक्षण मिळणार नाही"

२२ जानेवारीच्या आनंदोत्सवासाठी सज्ज राहा

अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारणीचे काम पूर्ण होत आहे. येत्या २२ जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिष्ठापना होणार आहे. हा क्षण आपल्या सर्वांसाठी स्वप्नपूर्तीचा आहे. सर्वत्र याचा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. या आनंदोत्सवासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. त्यासाठी सर्वांनी जय्यत तयारी करावी, असे आवाहन पाटील यांनी केले.

(Edited by- sudesh mitkar )

Chandrakant Patil On Reservation
Nagpur Blast : नऊ कामगारांच्या मृत्यूनंतर 'हे' तीन मंत्री फिरकलेदेखील नाहीत...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com