Sharad Pawar, Bachchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Sharad Pawar: वर्धापनदिनाच्या धावपळीतही वेळात वेळ काढून शरद पवारांनी केला बच्चू कडूंना फोन; म्हणाले...

Bachchu Kadu Protest : एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाच्या चर्चांमुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. वर्धापनदिनाच्या एवढ्या धावपळीच्या दिवशीही वेळात वेळ काढून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी थेट बेमुदत आंदोलन पुकारलेल्या बच्चू कडूंना फोन केला.

Deepak Kulkarni

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापन दिन धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन कार्यक्रम घेतले. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाच्या चर्चांमुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. वर्धापनदिनाच्या एवढ्या धावपळीच्या दिवशीही वेळात वेळ काढून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट बेमुदत आंदोलन पुकारलेल्या बच्चू कडूंना फोन केला.

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यातील मोझरी या गावी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गावी रविवार (ता.8) पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन छेडलं आहे. मात्र,या आंदोलनाला आता राजकीय नेतेमंडळी, प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटी सुरू झाल्या आहेत. हे आंदोलन सुरू केल्यानंतर बच्चू कडूंचं 2 किलो वजन कमी झाल्याचं माहिती समोर येत आहे.

याचदरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्धापनदिनाची गडबड असूनही थेट माजी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवारांनी यावेळी नितेश कराळे यांच्या फोनवरुन कडूंशी चर्चा करत तब्येतीची विचारपूस केल्याचं बोललं जात आहे. यावेळी पवारांनी कडूंशी विविध मुद्द्यांवर संवाद साधतानाच आंदोलनाबाबतही माहिती जाणून घेतली.

यावेळी बच्चू कडू म्हणाले, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक भेटायला आले होते.यावेळी पवारांना त्यांनी पालकमंत्र्यांशी बोलणं झाल्याची माहितीही दिली. तसेच पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून देऊ असंही सांगितलं. पण आता नुसत्या बैठकीच्या बदल्यात आपण उपोषण मागे घेणार नसून आम्हाला भेट नाही, तर निर्णय हवा असल्याचंही त्यांना सांगितल्याची माहिती पवारांना दिली.

माजी आमदार बच्चू कडू यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे त्यांची तब्येत खालावत चालली आहे. या आंदोलनामुळे त्यांचे वजन दोन किलोंनी घटले असून त्यांचा बीपी लो झाला असल्याची माहिती येत आहे. डॉक्टरांनी त्यांना तात्काळ औषधं घ्यावीत,असा सल्ला दिला आहे. मात्र, कडू यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.त्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी बच्चू कडूंच्या मोझरी या आंदोलनस्थळी जात त्यांची भेट घेणार आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यांच्या या मागणीला जरांगे यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. बुधवारी(ता.11) दुपारी 4 वाजता जरांगे कडूंची भेट घेणार आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय शेतकरी संघटनेचे प्रवक्ते राकेशसिंह टिकैत यांनी सोमवारी मोझरी इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळावर पोचले. टिकैत यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर थेट हल्ला चढवला. ते म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारने शेतीचे प्रश्‍न दुर्लक्षित राहावे, याकरिता शेतकऱ्यांच्या संघटनांमध्ये फूट पाडण्याचे काम चालवले आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर कोणीच लढू नये याकरिता धोरण आखली जात आहेत. तर, दुसरीकडे हेच सिंदूर वाटून ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा देत आहे, असा घणाघात भारतीय शेतकरी संघटनेचे प्रवक्ते राकेशसिंह टिकैत यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT