
Mumbai News : मुंबईतील मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ सोमवारी(ता.9) सकाळी भयंकर दुर्घटना घडली. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी लटकून जात होते. त्याचवेळी सीएसएमटीवरुन निघालेली दुसरी लोकल प्रवाशांना घासली. त्यामुळे झालेल्या अपघातात 13 प्रवासी खाली पडले आणि त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला. या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती सरकारला धारेवर धरलं होतं. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राज ठाकरेंना फटकारलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंब्रा रेल्वे दुर्घटनेवर संताप व्यक्त करतानाच सरकारला खडेबोल सुनावले होते. त्यांनी ‘लोकलाला दरवाजे लावल्यास लोकं गुदमरतील, कारण इतकी गर्दी लोकलध्ये असते. त्याची कल्पना आहे का तुम्हाला?’, असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी सीएम फडणवीसांना केला होता.
राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सोमवारी चार प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाला अक्कल आल्याचं दिसून आल्याचं म्हटलं होतं. तसेच मुख्यमंत्री फडणवीसांच्या मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या जलद लोकलच्या त्या वळणावर वेग कमी करण्यात आला. तर लोकलमधून प्रवास करताना आजही काही प्रवासी लटकलेले पाहायला मिळाले,काही प्रवासी चुकीच्या दिशेने उतरून रेल्वे रूळ क्रॉस करताना दिसले. भाडे न वाढवता एसी लोकल देण्याचा प्लॅन असल्याच्या वक्तव्याचा संदर्भ देत टीकेची झोड उठवली होती.
आता सीएम देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या लोकलला दरवाजे लावल्यास लोकं गुदमरतील, कारण इतकी गर्दी लोकलध्ये असते.त्याची कल्पना आहे का तुम्हाला? या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, लोकलला दरवाजे लावताना व्हेन्टिलेशनची व्यवस्था करणं, इतकं डोकं सरकारकडे असल्याचं म्हटलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना मुंब्रा रेल्वे अपघातावरही संतप्त प्रतिक्रिया दिली होती. रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा कशासाठी द्यावा, तिकडे जावं, त्यांनी बघावं.नसेल तर सुधारणा करावी. एकदा मुंबई लोकलमधून प्रवास करुन बघा, जर लोकलला दरवाजे बसवले तर लोक आत गुदमरुन मरतील. किती गर्दी असते त्याची तुम्हाला कल्पना आहे का, त्याची एक जागा बाहेर येण्यासाठी हवी आणि एक जागा आत येण्यासाठी हवी.माणसाची आपल्या देशात किंमतच नाही. हीच घटना जर परदेशात घडली असती, तर ते कसे बघतात. जे मंत्री परदेशात जातात, ते काय घेऊन येतात”, असा तिखट सवालही राज ठाकरेंनी केला होता.
मी रेल्वेने प्रवास केला आहे,त्यामुळे मला प्रवास माहीत आहे. कारण, त्यावेळी गर्दी कमी असायची. आता, मुंबईत संध्याकाळी मेट्रोत शिरून दाखवा, आज ज्या कर्व्हवर अपघात झालाय तो काय नवा नाही. रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे, त्यापेक्षा त्यांनी तिथे जाऊन स्थिती बघावी असा खोचक टोलाही राज यांनी लगावला होता.
राज ठाकरेंनी मुंबईतील वाढती गर्दी आणि रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढतानाच रेल्वेनं लोकलचे डोर क्लोज केले तर लोकं गुदमरून मरतील, असंही म्हटलं होतं. रस्ते नसल्यानं पार्किंग नाही,पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून ट्रॅफिक अडलं जातं. मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या अनेक ठिकाणी ही समस्या आहे. जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेडचा बंब आत जाऊ शकत नाही. अशी आपल्या शहराची अवस्था झाली असल्याचा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला होता.
आपल्याकडे टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही. आपल्याकडे बाहेरून येणारे लोंढे आहेत यामुळेच रेल्वे कोलमडली आहे. रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे, ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे. लोकांना चालायला फुटपाथ नाहीत. वाहनांसाठी रस्ते नाहीत. कोण येतंय कोण जातंय तुम्हाला माहिती नाही. फक्त मेट्रो आणि बाकीच्या ज्या काही सोयी-सुविधा करत आहेत याने प्रश्न सुटणार नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.