Sharad Pawar_Salil Deshmukh 
विदर्भ

Salil Deshmukh: अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांवर शरद पवारांनी सोपवली मोठी जबाबदारी; नागपूरमध्ये मोठे संघटनात्मक बदल

Salil Deshmukh: सलील देशमुख यांनी यापूर्वी विदर्भ युवा प्रमुख म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं काम पाहिलं आहे. त्यामुळं त्यांच्या कामगरीवर समाधानी असल्यानं त्यांना आता बढती देण्यात आली आहे.

Amit Ujagare

Salil Deshmukh: सलील देशमुख यांनी यापूर्वी विदर्भ युवा प्रमुख म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं काम पाहिलं आहे. त्यामुळं त्यांच्या कामगरीवर समाधानी असल्यानं त्यांना आता बढती देण्यात आली आहे. नागपूरमध्ये पक्षाकडून मोठे संघठनात्मक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये कोणावर कोणती जबाबदारी सोपवण्यात आली आहे, जाणून घेऊयात.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात नागपुरात संघटनात्मक फेरबदल करण्यात आले असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांची नागपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती होणार आहे. तर माजी अध्यक्ष प्रवीण कुंटे-पाटील यांची प्रदेश प्रवक्ता व सरचिटणीसपदी नियुक्ती होणार आहे. सलील देशमुख यांनी यापूर्वी विदर्भ युवा प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. त्याचबरोबर युवक प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती.

दरम्यान, नागपूर पदवीधर मतदारसंघाची जबाबदारीही पक्षाने त्यांच्यावर सोपवली होती. महाविकास आघाडीच्या पदवीधर निवडणुकीतही त्यांनी संघटनात्मक भूमिका बजावली आहे. सलील देशमुख यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. २०२४ विधानसभा निवडणूक काटोल मतदारसंघातून लढवली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT