Raj Thackeray Letter : राज ठाकरेंचे CM फडणवीसांना खरमरीत पत्र, '...तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत', 'त्या' प्रकारावर संताप!

Raj Thackeray Letter Devendra Fadnavis : राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून असंवेदनशील वर्तन करणाऱ्या लोकांचे राजीनामे घ्यावेत, असे म्हटले आहे
Devendra Fadnavis, Raj Thackeray
Devendra Fadnavis, Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray News : भाजपचे आमदार अमित साटम यांनी एका व्यक्तीच्या अपघाती मृत्यूच्या घटनेवर हसल्याचा आरोप करण्यात येत आहे. याविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र लिहून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. पत्रात कोणाचेही नाव न घेता त्यांनी भाजपच्या सत्ताधाऱ्यांवर "सत्तेचा माज" चढल्याचा आरोप केला असून, अशा नेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, "भाजपच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, असे देशभर बोलले जाते. पण हा संसर्ग आता महाराष्ट्रातही पसरला असून तुम्ही तो पसरू देत आहात का?" असा थेट सवाल त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना केला आहे. तसेच असंवेदनशील वर्तन करणाऱ्या लोकांचे राजीनामे घ्यावेत, असे म्हटले आहे.

एका व्यक्तीच्या मृत्यूवर भाजपचा आमदार आणि पदाधिकारी हसत असल्याचा उल्लेख करत, त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याबद्दल राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. "Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely," या प्रसिद्ध वाक्याचा उल्लेख करत त्यांनी सत्तेच्या अहंकारावर निशाणा साधला.

Devendra Fadnavis, Raj Thackeray
Nashik Ring Road : CM फडणवीसांच्या भेटीसाठी निघालेल्या शेतकऱ्यांना मंत्री उदय सामंतांनी लावला ब्रेक, आश्वासनानंतर आंदोलक फिरले माघारी

पत्रात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "तुम्ही एकही अवाक्षर बोलत नसल्यामुळे सगळेच बेफाम झाले आहेत. देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि संवेदनशील मुख्यमंत्री आहेत, अशी महाराष्ट्राची धारणा होती. मात्र अशा घटनांवर तुमचे मौन पाहून तुमच्या संवेदनशीलतेबद्दल शंका निर्माण होते," असे त्यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी भूतकाळातील राजकीय संस्कृतीचाही उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि प्रमोद महाजन यांसारख्या नेत्यांनी आपल्या पक्षातील नेत्यांच्या चुका कधीही पाठीशी घातल्या नव्हत्या. मात्र, सध्या स्वकीयांना संरक्षण दिले जात असून त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची प्रतिमा मलिन होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

CM योग्य संदेश देण्याची वेळ

पत्राच्या शेवटी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना थेट आवाहन करत, असंवेदनशील वर्तन करणाऱ्या लोकांचे राजीनामे घ्यावेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे रक्षण करावे, अशी मागणी केली आहे. तसेच, मुख्यमंत्री म्हणून योग्य संदेश देण्याची हीच वेळ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis, Raj Thackeray
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंवर मनमानी अन् एकतर्फी कारभाराचे आरोप; आणखी एक आदेश वादाच्या भोवऱ्यात : कोर्टात चॅलेंज

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com