Pune: शासन देतंय १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; सरकारच्या 'या' योजनेसाठी पुणे विभागातील महिलांची एकच गर्दी!

Aai Tourism Scheme, Women Tourism Loan, Maharashtra Tourism: 'आई' पर्यटन योजनेअंतर्गत महिलांना पर्यटन व्यवसायासाठी १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळत आहे. पुणे विभागातून १,७०० हून अधिक अर्ज दाखल झाले असून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Women entrepreneurs are availing benefits under Maharashtra's Aai Tourism Scheme, which provides interest-free loans of up to ₹15 lakh to promote tourism-based businesses across the state.
Women entrepreneurs are availing benefits under Maharashtra's Aai Tourism Scheme, which provides interest-free loans of up to ₹15 lakh to promote tourism-based businesses across the state.Sarkarnama
Published on
Updated on

Aai Tourism Scheme: पर्यटन क्षेत्रात स्वतःचे नशीब आजमावू पाहणाऱ्या आणि हक्काचा व्यवसाय उभा करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारची 'आई' पर्यटन योजना मोठा आधार ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला उद्योजिकांना पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यवसाय सुरू करण्यासाठी तब्बल १५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

शासनाच्या या योजनेला पुणे विभागातून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असून, कर्ज मिळवून व्यवसाय सुरू करण्यासाठी एकट्या पुणे विभागातून १७०० पेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले आहेत.

Women entrepreneurs are availing benefits under Maharashtra's Aai Tourism Scheme, which provides interest-free loans of up to ₹15 lakh to promote tourism-based businesses across the state.
Maharashtra Live Update : शेतकरी महिला अशी ओळख मिळणार; विधानसभेत अखेर विधेयक मंजूर

१५ लाखांचे आर्थिक बळ; महिला बनणार 'बॉस'

पर्यटन क्षेत्रात महिलांचे नेतृत्व वाढावे, त्यांनी केवळ नोकरी न करता स्वतःचे लघुउद्योग सुरू करून सक्षम व्हावे, यासाठी २०२३ पासून ही 'आई' योजना राबवली जात आहे. हॉटेल, होम- स्टे, ट्रॅव्हल एजन्सी, रिसॉर्ट किंवा पर्यटनाशी संबंधित कोणतेही स्टार्टअप सुरू करण्यासाठी महिलांना १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची मर्यादा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कर्जावरील व्याजाचा संपूर्ण बोजा सरकार उचलत असल्याने महिलांना हे कर्ज पूर्णपणे 'बिनव्याजी' मिळत आहे. याच सोयीमुळे पुण्याच्या महिलांनी या संधीचे सोने करण्याचे ठरवले आहे.

या योजनेअंतर्गत कर्ज सुविधेसोबतच पर्यटन विभागाकडून महिलांना 'टूरिस्ट गाईड' म्हणूनही विशेष व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. यामुळे महिलांना पर्यटनाच्या बाजारपेठेत उतरून स्वतःचा व्यवसाय विस्तारणे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे सोपे झाले आहे.

या योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून आतापर्यंत एकूण ४ हजार अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी तब्बल १ हजार ७०० पेक्षा जास्त अर्ज एकट्या पुणे विभागातून आले आहेत. म्हणजेच राज्याच्या एकूण अर्जांपैकी तब्बल ४० टक्क्यांहून अधिक अर्ज फक्त पुणे विभागातील महिलांचे आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांतील महिलांचा समावेश आहे. पश्चिमेकडील गड-किल्ले, निसर्गरम्य पर्यटन स्थळे आणि कोल्हापूर-साताऱ्यासारखा ऐतिहासिक वारसा यामुळे या भागातील महिलांमध्ये पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू करण्याची मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे.

Women entrepreneurs are availing benefits under Maharashtra's Aai Tourism Scheme, which provides interest-free loans of up to ₹15 lakh to promote tourism-based businesses across the state.
Majhe Astitva Scheme: एकल महिलांच्या सन्मानासाठी पुण्याचा पुढाकार; राज्यभर राबविणार ‘माझे अस्तित्व’ उपक्रम

मात्र, दुसरीकडे या योजनेला वेळेत व्याजाचा परतावा न मिळण्याचे ग्रहण लागले आहे. कर्ज वेळेत मंजूर होत असले आणि महिला अर्ज करत असल्या, तरी सरकारकडून व्याजाची रक्कम वेळेत जमा होत नसल्याने महिला व्यावसायिकांकडून आता हा परतावा तात्काळ आणि वेळेत जमा करण्याची मागणी केली जात आहे.

राज्यातील एकूण ४ हजार अर्जांपैकी पुणे विभागात सतराशे पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. 'आई' पर्यटन योजनेमुळे महिलांना पर्यटनात विशेष सवलती आणि संधी मिळत असून महिला उद्योजकांना मोठं प्रोत्साहन मिळत आहे. पुणे विभागातील महिलांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेतला आहे. अशी माहिती पर्यटन संचालनालय पुणे यांच्या कडुन देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com