Sharad Pawar Sarkarnama
विदर्भ

Sharad Pawar Vidarbh : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विदर्भात मोठा ‘स्कोप'! असे आहे गणित...

Rajesh Charpe

Vidarbh Political News : विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सध्या विदर्भात चाचपणी केली जात आहे. गैर राजकीय लोकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे महायुती सरकारबाबत मते जाणून घेतल्या जात आहे.

यातून काही निष्कर्ष काढण्यात आले असून विदर्भातील 18 ते 20 जागांवर राष्ट्रवादी उमेदवार उभे करणार असल्याचे संकेत दिले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे आणि माजी आमदार तसेच पक्षाचे प्रदेश सचिव जयदेव गायकवाड Jaydev Gaikwad यांनी पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांना भेटी दिल्या. या दरम्यान त्यांनी युवक, शेतकरी, साहित्य, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या गैर राजकीय लोकांच्या भेटीगाठी घेतल्या.

भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस NCP पक्षात केलेली फोडाफोडी कोणालाच रुचलेली नाही. रोजगार मिळत नसल्याने युवक संतप्त आहेत. शेतमालाला भाव नाही, उत्पादन खर्च निघत नसताना सरकार कुठलीच मदत देत नसल्या शेतकरीसुद्धा नाराज आहेत, याकडे लवांडे यांनी लक्ष वेधले.

आधी भाजप-सेना युती आणि आता महायुतीच्या सरकारमध्ये अनेक मंत्री विदर्भातील असतानाही फारसा बदल वा विकास झाला नाही. अनेकांना आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत याचीसुद्धा माहिती नाही. एकूणच भाजपवर सर्व सामान्य नागरिकांची रोष असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आढळून आले आहे. त्या दृष्टीने विधानसभा निवडणुकीची आखणी आणि बांधणी केली जाणार असल्याचेही लवांडेंनी स्पष्ट केले.

या दौऱ्याबाबत लवांडे म्हणाले, आम्ही निवडणुकीची चाचपणी करण्यासाठी आलो नाही. विदर्भातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती जाणून घ्यायला आलो. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेतातील लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांचे म्हणणे जाणून घेतले. त्यातून विदर्भातील जनता महायुती आणि केंद्र सरकारवर प्रचंड नाराज असल्याचे आढळून आले.

विद्यमान सरकार फक्त आश्वासने देतात. वेळ मारून नेतात. प्रत्यक्षात घोषणा व योजनांचे लाभ त्यांच्यापर्यंत पोहचतच नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून येथील जनतेला खूप अपेक्षा होती. तीसुद्धा फोल ठरली, अशी टीकाही लवांडेंनी केली.

लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भातील Vidarbh जनतेने मतपेटीतून आपला रोष व्यक्त केला. विधानसभेच्या निवडणुकतही हा राग दिसेल असे निरीक्षण आम्ही नोंदवल्याचे लवांडे आणि गायकवाड यांनी सांगितले. हे बघता विधानसभेत महाविकास आघाडीला मोठे यश मिळू शकते. राष्ट्रावादी काँग्रेसला मोठा स्कोप दिसत असल्याचे लवांडे यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT