raju shetti On CM Devendra Fadnavis News sarkaranama
विदर्भ

Raju shetty : शिखंडीचा डाव...सरकारच्या कमरेला चड्डी ठेवणार नाही; राजू शेट्टींच्या इशाऱ्याने आंदोलन चिघळणार

Maharashtra farmers protest News : आम्हाला मैदान रिकामे करण्यास सांगण्यात आले. आम्हाला येथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार आमच्यासोबत शिखंडीचा डाव खेळत आहे

Rajesh Charpe

Nagpur News : शेतकरी कर्जमाफीबाबात चर्चा करण्यासाठी मंत्री येणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. ते आलेच नाहीत. त्यापूर्वी कोर्टाचा आदेश आला. आम्हाला मैदान रिकामे करण्यास सांगण्यात आले. आम्हाला येथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार आमच्यासोबत शिखंडीचा डाव खेळत आहे, मात्र आम्हीसुद्धा तयार असून सरकारच्या कमरेला चड्डीसुद्धा ठेवणार नाही, असा इशारा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिला. यामुळे आता आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

न्यायालयाने सायंकाळी सहा वाजण्याच्या आत आम्हाला मैदान खाली करण्यास लावले आहे. दोन मिनिटांपूर्वी न्यायालयाचा आदेश आमच्यापर्यंत पोलिसांना पोहचवला. मंत्रीतर चर्चेसाठी भेटायला आलेच नाहीत. आता रात्र झाली. आंदोलन कुठे जाणार, आमच्या बहिणी आंदोलनात दोन दिवसांपासून बसल्या आहेत. त्यांनी रात्री कुठे जायचे हे सांगा असा सवाल यावेळी त्यांनी केला. फडणवीस सरकार रडीचा डाव खेळत आहे. मात्र आगे आगे देखो होता है क्या...असा इशारा देऊन त्यांनी सरकाराला उघड आव्हान दिले.

आजवर लाखो शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या. अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेली. जमीन खरडून गेली. याची दखल स्वतःहून न्यायालयाचा घ्यावीशी का वाटली नाही, तुमचे डोळे फुटले होते का? असा सवालही शेट्टी यांनी न्यायालयाला केला. आंदोलकांना मैदान रिकामे करण्याच्या आदेश देताना तुमचे हात कसे थरथरले नाहीत, असेही राजू शेट्टी (Raju shetti) म्हणाले.

संविधानाने न्यायालयाला अधिकार दिले आहेत. मात्र त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकारसुद्धा त्याच संविधानाने आम्हाला दिला आहे. तुम्ही तुमचे कर्तव्य करा, आम्ही आमचे करतो. पोलिसांना अटक करायची असेल तर खुशाल करा. आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

आम्हाला न्यायालयाचा अवमान करायचा नाही आणि आंदोलन सोडायचे नाही. पोलिसांनो गाड्या बोलवा, गाड्या लावा, प्रत्येक आंदोलक जेलमध्ये जाण्यास तयार आहे, आम्हाला खुशाल जेलमध्ये टाका, मात्र उद्या आम्ही पुन्हा आंदोलन स्थळी येऊ आणि आंदोलन करू. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय येथून कोणी हटणार नाही. शेतकऱ्यांसाठी ही निर्णायक लढाई आहे. आंदोलकांनीसुद्धा त्यांना मोठा प्रतिसाद दिल्याने आता सरकाराची आणि पोलिसांचीसुद्धा कोंडी झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT