BMC Election News : ठाकरे बंधूंच्या युतीमुळे एकनाथ शिंदेंचा 'महा'फायदा? आघाडीचा गुंता सुटेना, सत्तेचं गणित बिघडणार!

Eknath Shinde News : भाजप एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जास्तीच्या जागा सोडणार असल्याने त्यांचा फायदा होणार आहे तर महाविकास आघाडीतील काँग्रेस व शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही घटकपक्ष ठाकरे बंधूसोबत राहतील की नाही, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.
devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeray
devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeraysarkaranama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून निवडणुकीची वेगाने तयारी केली जात आहे. राज्यातील सर्वच प्रमुख पक्षाचे लक्ष मुंबईतील महापालिका निवडणुकीकडे लागले आहे. भाजपने गेल्या सहा महिन्यापासून मुंबई महापालिकेवर कब्जा मिळवण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे राज-उद्धव ठाकरे यांची युती होण्याची शक्यता असल्याने वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

मनसे व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची युती होणार असल्याने राज्यातील चित्र पालटणार आहे. त्यातच मुंबईत 150 जागा लढण्याचा निर्धार भाजपने केला आहे. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे व राज ठाकरे मुंबईत एकत्र आल्याने भाजप एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जास्तीच्या जागा सोडणार असल्याने त्यांचा फायदा होणार आहे तर महाविकास आघाडीतील काँग्रेस व शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही घटकपक्ष ठाकरे बंधूसोबत राहतील की नाही, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याने वातावरण तापले आहे. येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीपूर्वीच हिंदीसक्तीच्या मुद्यावरून प्रथमच एका व्यासपीठावर आलेल्या ठाकरे बंधूंमधील राजकीय जवळीकता गेल्या एकही दिवसापासून वाढत गेली आहे. त्यामुळे आता येत्या काळात ठाकरे बंधू एकत्र येतील असा कयास आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeray
Eknath Shinde : भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्याने एकनाथ शिंदे अस्वस्थ, दिल्लीत काय ठरलं?

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) अनेक माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जवळपास 70 ते 80 जागांवर दावा करण्यात आला आहे. त्यातच महायुतीमध्ये आणखी एका पक्षाला घेतले तर भाजपच्या वाट्याला कमी जागा येणार होत्या. भाजपला जवळपास 150 जागा लढवायच्या असल्याने महायुतीत नव्या जोडीदाराला घेणे अवघड झाले आहे.

devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeray
Ajit Pawar NCP's Politics : जिल्हाध्यक्षांनी आमदार निकमांना तोंडावर पाडलं? म्हणाले, राष्ट्रवादीच्या स्वबळाचा नारा फक्त अफवाच

त्यामुळे सर्व महापालिकांमध्ये महत्त्वाची मानली जाणारी मुंबई महानगरपालिका निवडणूक शिवसेना व भाजप अशा युतीनेच लढवण्यावर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचे एकमत झाले आहे. येत्या काळात महायुतीत नवा गडी येण्याचा मार्ग बंद झाल्याने आता एकनाथ शिंदे (Ekanath shinde) यांना 5 ते 10 जागा वाढवून मिळणार आहेत.

devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeray
Ajit Pawar News : ओ दादा, कर्जमुक्तीवर बोला.. नांदेडच्या सभेत शेतकऱ्याची आरोळी! अजित पवार म्हणाले, आम्ही शब्दाचे पक्के

उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मनसे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्रित येऊन लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. परंतु, उद्धव ठाकरे मविआचा एक भाग असल्यामुळे आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्याबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत अद्याप गुंता कायम आहे. राज ठाकरेंना मुंबईत सोबत घेतले तर त्यांना जागांमधला मोठा वाटा द्यावा लागणार आहे.

devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeray
Devendra Fadnavis : ज्या फलटणमध्ये डाॅक्टर तरुणीची आत्महत्या तेथेच आज मुख्यमंत्री फडणवीसांचा कृतज्ञता मेळावा, काय भूमिका मांडणार?

राज्यातील मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक या महानगरपालिकांमध्ये मनसेला अधिक जागा द्यायच्या व उर्वरित महाराष्ट्रात काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जुळवून घ्यायचे यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विचार विनमय सुरु आहे. अशा सर्व परिस्थितीत इतर स्थानिक स्वराज्य संस्थांतील लढाईचे चित्र अस्पष्ट असताना मुंबईत मात्र फडणवीस व शिंदे यांच्या महायुतीविरोधात ठाकरे बंधू असा मुकाबला रंगणार असल्याचे निश्चित आहे. विशेषतः या ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा चांगलाच फायदा होणार आहे. त्यांना पाच ते दहा जागा वाढवून मिळणार आहेत.

devendra fadnavis | eknath shinde | raj thackeray | uddhav thackeray
CM Fadnavis announcement : महिला डाॅक्टर आत्महत्या प्रकरणात फलटणमधून CM फडणवीसांची मोठी घोषणा अन् माजी खासदार निंबाळकरांना क्लिन चिट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com