Supreme Court Shiv Sena Case : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हं कोणाचे, यावर सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात यासाठी कायदेशीर घमासान सुरू आहे.
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थितीत केले आहे. यातून शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले, धनुष्यबाण काही गोठले जाणार नाही. त्यासाठी खर्च करण्याची देखील गरज नाही. कोर्टात केस सुरू आहे. शिवसेनेत जो काही गट तयार झाला आहे, त्यातील बहुसंख्या ही एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. मी जिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. इथे आमदार-खासदारांचाच प्रवेश होतोय असे नाही, तर शिवसैनिकांचा देखील प्रवेश होतो आहे.
'मूळ शिवसेना (Shivsena) वाढत आहे. आमदार-खासदारांचाच नाही, तर मूळ शिवसैनिकांचा भर देखील आहे. पक्ष चालवण्याकरता ग्राऊंड पातळीवर काम करण्याची गरज असते. ती संपल्यानंतर कार्यकर्ते पक्ष बदलणारच, शिवसैनिकांनी शिवसेनेचीच निवड केली आहे. हा उठाव आमदार-खासदारांपर्यंतचा नाही, तर कार्यकर्त्यांपर्यंत गेला आहे', असेही बच्चू कडू यांनी म्हटले.
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कुणाची यावर सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे पक्षाकडून युक्तिवाद झाल्यानंतर, आता एकनाथ शिंदे शिवसेनेकडून युक्तिवाद सुरू आहे. निवडणूक आयोगाने देखील आपल्या वकिलांमार्फत सर्वोच्च न्यायालयासमोर बाडू मांडली आहे.
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी सवाल केला की, "दोन्ही गटांना राखीव चिन्ह न देता स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढण्यास सांगण्याचा पर्याय निवडणूक आयोगाकडे नव्हता का? असा सवाल केला. यामुळे चर्चांना तोंड फुटले आहे. यातच शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हं गोठवले जाणार अशा चर्चांना बळ मिळू लागले आहे.
न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या आकलनावर आणि पक्षाची ओळख ठरवण्यासाठी वापरलेल्या निकषांवर सर्वोच्च न्यायालयाने बोट ठेवले आहे. निवडणूक आयोग विवेकाधिकाराचा वापर कसा केला जातो आणि संबंधित संभाव्य परिणामाचा शोध घेतला जातो की नाही, हे तपासावे लागणार आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या टिप्पणीमुळे निवडणूक आयोगाचा निकाल सर्वोच्च न्यायालय फिरवणार? निकाल नेमका काय लागणार? याची उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.