Dhadgaon Nagar Panchayat Election Sarkarnama
विदर्भ

Dhadgaon Nagar Panchayat Election : धडगाव नगरपंचायतीवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला; काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव!

Akkalkuwa Assembly Constituency Politics : अक्कलकुवा विधानसभेत संपर्कप्रमुख विजयसिंग पराडके यांचा दबादबा कायम असल्याचे निवडणूक निकालावरून दिसून आले आहे.

Mayur Ratnaparkhe

सागर निकवाडे-

Nandurbar District Politics : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक 14 मधील काँग्रेसचे पक्षाचे नगरसेविका गिरिजा पावरा यांना शासकीय आश्रम शाळेत नोकरी लागल्याने त्यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागेवर पुन्हा पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यात काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत शिवसेना शिंदे गटाचे ममता पावरा यांना 358 मते मिळाली असून 93 मतांनी त्यांचा विजयी झाला आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा धडगाव नगरपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाने आपला भगवा फडकवला असून अक्कलकुवा विधानसभा संपर्कप्रमुख विजयसिंग पराडके यांचे वर्चस्व पुन्हा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

धडगाव नगरपंचायतीत एकूण 17 सदस्य असून यात सुरूवातीला शिवसेना(Shivsena) शिंदे गटाचे 13 सदस्य होते. काँग्रेस पक्षाचे 03, भाजपाचे 01 सदस्य असे संख्याबळ होते. पोटनिवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गटाचे 14 सदस्य झाले काँग्रेसचे दोन,भाजपाचे एक असे संख्याबळ झाले आहे. धडगाव तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा संपर्कप्रमुख विजय पराडके यांचं राजकीय वर्चस्व मोठे आहे.

विकास कामांना अधिक गती मिळणार -

'धडगाव नगरपंचायतीत शिवसेना शिंदे गटाची सत्ता असून प्रभाग क्रमांक 14 मधील उमेदवार आणि राजीनामा दिल्यामुळे पुन्हा पोटनिवडणूक झाली. त्यात काँग्रेस(Congress) उमेदवाराचा पराभूत करत आमचा उमेदवार निवडून आला आमच्याकडे 13 नगरसेवक होते. पण या पोटनिवडणूक विजयानंतर आमच्याकडे 14 नगरसेवक आहेत. यामुळे येणाऱ्या काळात विकास कामांना अधिक गती मिळणार आहे.' अशी प्रतिक्रिया शिंदे गटाच्या शिवसेनेचे धडगाव अक्कलकुवा विधानसभा संपर्कप्रमुख विजयसिंग पराडके यांनी दिली आहे.

आश्वासने पूर्ण करण्याचं काम करणार -

'धडगाव नगरपंचायतीचा प्रभाग क्रमांक 14 मधून मी उमेदवार म्हणून रिंगणात होते. काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून मी 93 मतांनी विजयी झाले. या अगोदर देखील मी निवडणूक लढवली होती मात्र त्यात माझा पराभव झाला होता. परंतु पराभवातून खचून न जाता मी पुन्हा एकदा निवडणूक लढवली आणि काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत विजयी झाले. आगामी काळात माझ्या प्रभागामध्ये विकास कामांवर मी भर देणार आहे. यासोबतच मतदारांना दिलेला आश्वासने पूर्ण करण्याचं काम करणार आहे.' अशी प्रतिक्रिया विजयी उमेदमवार ममता पावरा यांनी दिली.

मोठ्या उत्साहात विकासाची कामे होतील -

धडगाव नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 14 च्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर आम्ही तयारीला लागलो. आम्हाला विश्वास होता की आमचा उमेदवार निवडून येईल त्या दृष्टीने आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार निवडून आल्याने धडगाव नगरपंचायतीचे आमचे संख्याबळ आता वाढलं असून मोठ्या उत्साहात विकासाची कामे होतील. अशी प्रतिक्रिया धडगाव नगरपंचायत नगराध्यक्ष धनसिंग पावरा यांनी दिली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT