Raj Thackeray : राज ठाकरेंचा ताफा विदर्भात अडवला तर जागेवरच चोप देणार; आक्रमक मनसेचा इशारा

Aggressive MNS Warning : सोलापूरमधील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असे विधान केले होते. त्यानंतर राज ठाकरेंच्या विरोधात मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
Aditya Durugkar -Raj Thackeray
Aditya Durugkar -Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 12 August : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. मराठवाड्याचा दौऱ्यावर असताना सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा अडविण्यात आला होता. त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत.

त्या पार्श्वभूमीवर ‘विदर्भात राज ठाकरेंचा ताफा अडवला तर तेथेच चोप देण्यात येइल’ असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी सोलापूरमधून मराठवाडा दौरा सुरू केला होता. सोलापूरमधील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असे विधान केले होते. त्यानंतर राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) विरोधात मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचा जाब राज ठाकरेंना जागोजागी विचारला जात आहे.

धाराशिवमध्ये राज ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. ठाकरे यांनी मुक्काम केलेल्या हॉटेलसमोर मराठा समाजाने राज यांचा निषेध नोंदविला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांशी चर्चा केली होती. त्यानंतर पुढे बीडमध्ये गेल्यानंतरही मराठा समाजाने राज ठाकरे यांचा ताफा अडवला होता.

Aditya Durugkar -Raj Thackeray
Sharad Pawar Barshi Tour : शरद पवारांचा बार्शी दौरा अन्‌ राजकीय गाठीभेटी!

राज ठाकरे यांच्या गाडीवर बीडमध्ये सुपाऱ्या फेकल्या होत्या, त्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. खुद्द राज ठाकरे यांनी मराठा समाजाच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे सर्व करत आहेत’, असा आरोप केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या गाडीवर टोमॅटो फेकण्याचा प्रयत्न झाला होता.

रम्यान, मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे हे लवकरच विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनसेही आक्रमक झाली आहे. विदर्भात राज ठाकरे यांचा ताफा अडवला तर त्याच ठिकाणी संबंधितांना चोप देण्यात येईल, असा खणखणीत इशारा मनसेचे नागपूर जिल्हाप्रमुख आदित्य दुरुगकर यांनी दिला आहे.

Aditya Durugkar -Raj Thackeray
Sharad Pawar ; तुम्ही प्रणिती शिंदे, मोहिते पाटलांना निवडून दिलं; आता आमचं कर्तव्य; पवारांनी भटक्या विमुक्तांना काय दिला शब्द?

राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. यापूर्वी जेव्हा सुरक्षा काढण्यात आली होत, तेव्हा मनसैनिकांना त्यांच्या मुंबईतील बंगल्याला सुरक्षा पुरवली होती. आताही विदर्भात मनसैनिकांची राज ठाकरे यांचा सुरक्षा असणार आहे. विदर्भात आल्यानंतर राज ठाकरेंचा ताफा अडवला तर संबंधितांना जागेवरच चोप देण्यात येईल, असेही दुरुगकर यांनी जाहीर केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com