BJP Shiv Sena conflict Sarkarnama
विदर्भ

BJP Shiv Sena conflict : राणेंनी 'बाप' दाखवला; मंत्री राठोड म्हणाले, 'कोण कोणाचा? काळ अन् वेळच...'

Shiv Sena Minister Sanjay Rathod Slams BJP Nitesh Rane in Yavatmal : भाजप मंत्री नीतेश राणे यांनी शिवसेनेला बाप दाखवताच, शिवसेना मंत्री संजय राठोड यांनी सुनावलं.

Pradeep Pendhare

Sanjay Rathod Vs Nitesh Rane : राज्यातील महायुती सरकारमधील भाजप अन् एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील शीतयुद्धाचा कधी भडका उडेल, याचा अंदाज नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानिमित्ताने हा भडका अधिकच उडणार असल्याचा अंदाज आहे.

धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या विविध विकास कामांना स्थगिती मिळाल्यानंतर जिल्ह्याचा पालक-चालक यावरुन वाद पेटला असताना, भाजप मंत्री नीतेश राणेंनी शिवसेना बाप दाखवला. यावरून एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते, मंत्र्यांनी पलटवार करण्यास सुरूवात केली असून, शिवसेना मंत्री संजय राठोड यांनी मंत्री राणेंना चांगलचं सुनावलं आहे.

भाजप (BJP) मंत्री राणेंना त्यांचे थोरले बंधू नीलेश राणेंनी सबुरीचा सल्ला दिला. त्यावर मंत्री राणेंनी उलट नीलेश राणेंना आक्रमक होण्याचा सल्ला दिला. या दोघा राणे बंधूंचे ट्विटर वाॅर राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. भाजप मंत्री राणे यांच्या बाप दाखवण्याच्या भूमिकावर यवतमाळमधील शिवसेना मंत्री संजय राठोड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. यावरून महायुतीमधील भाजप अन् शिवसेनेमधील शीतयुद्ध टोकावर पोचल्याचं दिसतं.

मंत्री राठोड (Sanjay Rathod) यांनी यावर प्रतिक्रिया देताना, थोरले बंधू नीलेश राणेंनी मंत्री राणेंना दिलेल्या सल्ल्याकडे लक्ष वेधले. 'राजकारणात कोण कोणाचा बाप असतो, हे काळ आणि वेळ दाखवणार आहे. बोलताना काय बोलावं, कशा पद्धतीने बोलावं, हा खऱ्या अर्थाने जो स्टेटमेंट देणाऱ्या व्यक्ती आहे, त्याला समजलं पाहिजे', असा टोला देखील मंत्री राठोड यांनी मंत्री राणेंना लगावला.

भाजप अन् शिवसेने युती ताणली जातेय

भाजप मंत्री नीतेश राणेंनी धाराशिव जिल्हा नियोजन समितीतील कामांना स्थगिती दिल्याच्या मुद्द्याचा संदर्भ देताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर हल्ला चढवला होता. कुणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसेही नाचले, तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा. सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, असा धमकीवजा इशाराच, त्यांनी शिवसेना नेत्यांना दिला होता. यावरून महायुतीमधील शिवसेना चांगलीच संतपाली असून, भाजपला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. यातून भाजप अन् शिवसेनेची युती ताणली जात आहे.

राणे बंधूंमध्ये 'वॉर'

मंत्री नीतेश राणे यांच्या या आक्रमकतेवर त्यांचे थोरले बंधू शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी सबुरीचा सल्ला दिला. यावर देखील मंत्री राणे यांनी तु्म्ही देखील आक्रमक भूमिका स्वीकाराला, असा सल्ला दिला आहे. यावरून या दोघा राणे बंधूंमध्ये ट्विटवॉर रंगले असून, त्याची सध्या राज्यात चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT