Arvind Sawant On Sanjay Gaikwad Sarkarnama
विदर्भ

Arvind Sawant On Sanjay Gaikwad : गायकवाड प्रकरणात ठाकरेंच्या शिलेदारानं मोदींना ओढलं; म्हणाले, 'नेताच तसाच, तर खाली काय...'

Arvind Sawant Slams PM Narendra Modi Over ShivSena Mla Sanjay Gaikwad Assault Case During Buldhana Visit : शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी बुलढाणा दौऱ्यात आमदार संजय गायकवाड यांच्यावरून पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

Pradeep Pendhare

Sanjay Gaikwad controversy : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास इथं कॅन्टीन व्यवस्थापकाला केलेल्या मारहाणीवरून राज्यभरातून भाजप महायुती सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका होत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी देखील टायमिंग साधत, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांचे नाव न घेता, या वादात ओढले आहे. 'याचा वरचा नेताच तसाच, तर खाली काय वेगळं असणार', असा झोंबणारा टोला अरविंद सावंत यांनी लगावला आहे.

बुलढाणा इथले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर मुंबई (Mumbai) मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यावरून विरोधकांना नालायक म्हटले. यावर अरविंद सावंत म्हणाले, "आता महाराष्ट्राने ठरवायचे नालयात कोण? बुलढाण्यातली मतदारांनी स्वतः अंतर्मुख व्हायला पाहिजे की, आपण हातावर कोणता डाग पाडून घेतला".

संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी पश्चाताप नसल्याची भावना देखील बोलून दाखवली. त्यावर बोलताना खासदार सावंत म्हणाले, "त्याने कधी कोणता पश्चाताप केला. इथं देखील जमीन बळकावल्या आहेत. गरिबांच्या जमिनी बळकावल्या आहेत. त्या गरिबांना शोधा, म्हणजे सर्वांना कळेल". पुतळे लावायचे, अन् त्यामागून लोकांना लुटायचे, दहशत माजवायची, हे धंदे करायचे. जयश्रीताई शेळके थोडक्यात राहिला. नाहीतर ही घाण गेली असती, असे देखील खासदार सावंत यांनी म्हटले.

'अदखलपात्र गुन्हा म्हणजे, काहीच नाही. कायदा-सु्व्यवस्था कुठे राहिली. अधिवेशन काळ सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष काय करत आहेत. दंडाधिकारी म्हटले जाते, त्यांना. आमदार निवास आणि व्यवस्था देखील त्यांच्या अंतर्गत येते. हे प्रकरण त्यांनी खूप गंभीर घ्यायला पाहिजे होते', असे खासदार सावंत यांनी म्हटले.

'देशाचं पंतप्रधान आरोप करतात की, 75हजार कोटींचा घोटाळ्याची बोंब मारली अन् ज्याच्याविरोधात आरोप केले, तेच त्यांच्याबरोबर आठ दिवसात आले. सन्मानानं घेतलं गेलं. मंत्री केलं जातं. इथं बाकीच्यांच काय घेऊन बसता. जिथं नेता असा असेल, तिथं खाली काय वेगळं असेल', असा टोला नरेंद्र मोदी यांना नाव न घेता खासदार सावंत यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT