Nilesh Lanke protest : पवारांच्या शिलेदारांचं बेमुदत उपोषण; अधिकाऱ्यांवर तोंड लपवण्याची वेळ

NCP MP Nilesh Lanke Protests Outside Collector Office Over Road Work in Ahilyanagar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी वर्षभराच्या अंतरावर पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.
Nilesh Lanke protest
Nilesh Lanke protestSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar road work issue : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी वर्षभराच्या अंतरावर पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे. गेल्यावेळी कांदा अन् दुधाच्या दराचा प्रश्नांवर आंदोलन केलं होतं, आता रस्त्याच्या मुद्यावर खासदार लंके आक्रमक झाले आहे. अधिकाऱ्यांशी चर्चा निष्फळ झाल्यानंतर, खासदार लंकेंनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे.

नगर तालुक्यातील विळद बायपास ते सावळी विहीर या 75 किलोमीटरच्या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आपल्या सहकाऱ्यांसह करत आज दुपारी बारा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ केला.

खासदार नीलेश लंके म्हणाले, "सहा वर्षांपासून या रस्त्याच्या कामाची प्रतिक्षा असून जनतेच्या सहनशिलतेचा अंत झाला आहे. सन 2018 पासून रखडलेले हे काम आता तिसऱ्यांदा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. दरवेळी नव्या तारखा, नव्या घोषणा देण्यात येतात, प्रत्यक्ष मात्र कामाला सुरूवात होत नाही".

Nilesh Lanke protest
MLA Sanjay Gaikwad first reaction : बलात्काराचा गुन्हा आहे का? पोलिसांना अधिकारच नाही; विरोधकांना 'नालायक' म्हणत संजय गायकवाड अजूनही 'मगरूरीत'

'रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झालेल्या अपघातात गेल्या चार वर्षात 388 प्रवाशांना घटनास्थळीच आपला जीव गमवावा लागला. अपघात (Accident) होऊन जखमी झालेल्या व औषधोपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या गृहीत धरली, तर ही संख्या एक हजारांहून अधिक होते. याचा विचार करून प्रशासनाने या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करणे गरजेचे आहे', असे खासदार लंके यांनी म्हटले.

Nilesh Lanke protest
Eknath Shinde Delhi visit : शिवसेना पक्ष अन् चिन्हं खटला, शिंदेंचा दिल्ली दौरा; शाह, सिंह अन् गडकरी वकील आहेत का? राऊतांना गंभीर शंका

4 आमदार व 2 दोन खासदारांच्या मतदारसंघातील रस्ता

अहिल्यानगर जिल्ह्यातील 4 आमदार व 2 दोन खासदारांच्या मतदारसंघातून हा रस्ता जातो, असे असतानाही गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, ही प्रशासनाचे आणि सरकारचे साफ अपयश आहे. या रस्त्याच्या कामासाठी आपण स्वतः सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आहे. त्यासाठी आपण यापूर्वीही उपोषण केले होते. या रस्त्याच्या कामासंदर्भात केवळ आश्वासनांची मालिका सुरू आहे, असा घणाघात खासदार लंकेंनी केला.

थातुर-मातुर काम

खासदार लंकेंनी या कामाची एप्रिल 2025मध्ये वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. अवकाळी पावसाच्या नावाखाली हे काम टाळले जात आहे, ही थट्टा आहे. रस्त्याच्या दुरूस्तीच्या नावाखाली काही ठिकाणी थातुर-मातुर काम सुरू, असून प्रत्यक्ष मुळ कामाला मुहुर्त कधी? असा सवाल करत पावसाळ्याच्या तोंडावर वर्क ऑर्डर, आणि कामाची पुढची गती अनिश्चित असल्याचा आरोप खासदार लंकेंनी केला.

लंके-अधिकाऱ्यांची चर्चा निष्फळ

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी खासदार नीलेश लंके यांनी उपोषणास सुरवात केल्यानंतर लगेच भेट घेऊन पावसामुळे दोन महिने वाट पाहून, त्यानंतर काम सुरू करू, अशी भूमिका मांडली. मात्र खासदार लंके यांनी या रस्त्याची झालेली दुरवस्था, त्यामुळे झालेले अपघात आणि नागरिकांचे झालेले मृत्यू याची माहिती देत, काम सुरू करा, तोपर्यंत मी आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com