MLA Sanjay Gaikwad first reaction : बलात्काराचा गुन्हा आहे का? पोलिसांना अधिकारच नाही; विरोधकांना 'नालायक' म्हणत संजय गायकवाड अजूनही 'मगरूरीत'

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad First Reaction on Canteen Assault Case at Mumbai MLA Residence : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केल्यानंतर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे.
MLA Sanjay Gaikwad first reaction
MLA Sanjay Gaikwad first reactionSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Gaikwad controversy : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी सुमोटोनुसार गुन्ह्याची नोंद झाली.

आमदार गायकवाडांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद होत असतानाच, त्यांची त्यावर प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. 'बलात्काराचा गुन्हा आहे का? मारहाणीचा गुन्हा आहे. पोलिसांना तक्रारीचा अधिकारच नाही. यावरून वाद निर्माण घालणारे विरोधक, हे 'नालायक विरोधक' आहे', अशा 'मगरूरीत' आमदार गायकवाडांनी प्रतिक्रिया दिली.

शिवसेनेचे (Shivsena) आमदार संजय गायकवाड म्हणाले, "गुन्हा दाखल झाला, तर मी समोरं जाईल. गंभीर काहीच नाही. मेडिकल कुणाचंही झालेलं नाही. कुणी जखमी नाही. गंभीर मारहाण नाही. सौम्य मारहाण आहे". माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय का? करप्शनचा गुन्हा दाखल झालाय का? माझ्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे आणि तो मी मान्य करत आहे, असेही संजय गायकवाड म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दखल घेतल्यानंतर हा गुन्हा दाखल झाल्याचे विरोधक म्हणत आहे, यावर बोलताना "कशाप्रकारेही हा गुन्हा दाखल झाला असेल, तर तो मी फेस करणार आहे. माझ्या माहितीनुसार, असा गुन्हा दाखल करण्याचा किंवा तक्रारीचा पोलिसांना अधिकार नाही, असे म्हणत आमदार गायकवाडांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाला चॅलेंज केल्याचं बोललं जात आहे.

MLA Sanjay Gaikwad first reaction
Eknath Shinde Delhi visit : शिवसेना पक्ष अन् चिन्हं खटला, शिंदेंचा दिल्ली दौरा; शाह, सिंह अन् गडकरी वकील आहेत का? राऊतांना गंभीर शंका

गुन्ह्याला कसं फेस करणार, यावर बोलताना संजय गायकवाड यांनी हसत उत्तरं देताना, 'दाखल गुन्ह्याला फेस करू, फाईट करू, पोलिसांनी जबाब मागितल्यानंतर तो देवू, याच्यापलीकडे काय? मी मारहाणीचं समर्थन करतो. कितीवेळा कबुल करायचं?', असा प्रतिप्रश्न केला.

MLA Sanjay Gaikwad first reaction
BJP Mahayuti Fake Order Case : ग्रामविकास विभागाचा बनावट आदेश; दोन गुन्हे दाखल, ठेकेदार पसार, तर पोलिसांना वेगळाच संशय

"मला या मारहाणीचा अजितबात पश्चाताप नाही. अरे 302, 307चा गुन्हा असेल, तर त्यात पोलिस फिर्यादी होऊ शकतात. माझ्या प्रकरणात कुणीही किंवा मार खाणाऱ्याने तक्रारच दिलेली नाही. सरकार अडचणीत येणासारखा हा एवढा मोठा विषय आहे का? एक सौम्य मारहाणीचा विषय आहे. महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे, एवढा काय मोठा मुद्दा आहे का? विरोधकांनी हा मुद्दा मोठा समजला असून ते नालायक विरोधक आहे", अशा शब्दात संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com