MLA Sanjay Gaikwad Sarkarnama
विदर्भ

MLA Sanjay Gaikwad : एकेकाला तोडल्याशिवाय राहणार नाही; संजय गायकवाड भडकण्याचं कारण काय ?

Mehakar Criminals : मेहकरमध्ये 30 गुंडांच्या टोळक्याचा धुडगूस

Sunil Balasaheb Dhumal

Buldana Political News : मेहकर शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने धार्मिक कारणावरून राडा केला. मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसमोर फटाका फोडला, तिची छेड काढली. तिला वाचवायला आलेल्यांनादेखील लाठी-काठीसह दगडांनी मारहाण केली. तसेच टोळक्याने घरात घुसून सामानाची तोडफोड केली. यावर आमदार संजय गायकवाड चांगलेच भडकले. (Latest Political News)

टोळक्याच्या धुडगुसाची माहिती मिळाल्यानंतर आमदार संजय गायकवाड आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या ४०-५० वाहनांचा ताफा घेऊन मेहकरमध्ये पोहोचले. त्यांनी मेहकरच्या ठाणेदाराला झाप झाप झापले. पोलिसांनी संबंधित गुंडांवर गुन्हे दाखल केले आहेत. असे असले तरी आमदार गायकवाडांचा राग शांत झाला नव्हता. माझा हिशोब बाकी आहे. संबंधित गुंडांना जामीन मिळाल्यावर एकेकाला तोडल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला.

मेहकरमध्ये नेमकं काय झालं ?

मेहकर शहरातील मोळा रोडवर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी ४३ वर्षीय नेहाताई काटकर यांच्या तक्रारीवरून २५ ते ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार काटकर या आमदार संजय गायकवाड यांच्या भाची आहेत.

काटकरांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या गल्लीतील महिलांसह मंदिरात दर्शनासाठी जात होत्या. त्यावेळी २० ते २५ जणांच्या टोळके हातात लाठ्याकाठ्या घेऊन महिलांना आडवे आले. त्यातील १५ वर्षीय मुलीसमोर फटाका फोडला, अश्लील हावभाव करून मुलीची छेड काढली. तसेच काटकर यांच्या अंगावरील १ तोळा सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेतले.

या वेळी तक्रारदार काटकर यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यावेळी त्यांचा मुलगा आणि त्याचा मित्र धावत आला. या वेळी टोळक्याने त्या दोघांनाही बेदम मारहाण केली. या वेळी काटकर त्यांच्या घरात गेल्या. त्यांच्या पाठोपाठ गुंडही घरात घुसले. तेथे गुंडांनी सामानाची तोडफोड करून नासधूस केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. (Maharashtra Political News)

काय म्हणाले आमदार गायकवाड ?

घटनेची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड शेकडो कार्यकर्त्यांसह मेहकरमध्ये पोहोचले. या वेळी घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणी केली. "हा वाद धार्मिक कारणावरून आहे. मंदिरात आरती का लावता? छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टेटस का ठेवता, या कारणांमुळे वाद झाला आहे," असे आमदार गायकवाड म्हणाले.

"आम्हीदेखील छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. काल दिवाळी नसती तर एकेकाचे तुकडे केले असते. आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी माझा हिशोब बाकी आहे. त्यांची जमानत झाल्यावर एकेकाला तोडल्याशिवाय राहणार नाही," असाही दमही संजय गायकवाड यांनी दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT