Nagpur News : रामटेक विधानसभा मतदारसंघात उद्धव सेनेचे कार्यक्रम, बैठका आणि राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. हे बघता महाविकास आघाडीने रामटेक उद्धव सेनेसाठी सोडला असल्याचे स्पष्ट झाले असून आता मशाल घेऊन शिवसैनिकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्त्रीशक्ती संवाद यात्रेच्या निमित्ताने महिला मेळावा घेऊन रामटेक मतदारसंघातील घराघरात मशाल पेटवण्याचे आवाहन केले आहे.
रामटेक विधानसभा मतदारसंघातील पारशिवनी येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी पंधराशे रुपये मासिक अनुदान देऊन महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप महायुती सरकारवर केला. लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या (Shivsena) रामटेक लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी (Congress) सोडला होता. (Uddhav Thackeray News)
तब्बल १० वर्षानंतर काँग्रेसने महाविकास आघाडीला येथून विजय प्राप्त करून दिला. या बदल्यात उद्धव सेनेने रामटेक विधानसभा आणि नागपूरमधील एक मतदारसंघाची मागणी केली आहे. रामटेकवर जवळपास सर्वांचीच संमती झाली असल्याचे दिसून येते. किशोरी पेडणेकर यांनी राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असल्याचे सांगून राज्याची कायदा व सुव्यवस्था बिघडलेली असल्याचा आरोपही केला.
महिला, युवती व माता-भगिनींच्या संरक्षणाची गरज आहे. परंतु निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या तिजोरीचा गैरफायदा घेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवल्या जात आहे. जाहिरातीवर अव्वाढव्य खर्च करून राज्याची तिजोरी लुटल्या जात आहे. राज्यातील स्त्रियांचे मतांतर करण्याचे सत्ताधाऱ्याचे हे स्वार्थी नियोजन निष्क्रिय करण्याचे आव्हानही यावेळी त्यांनी उपस्थित महिलांना केले.
शिवसेना रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे यांनी महिलेच्या सुरक्षितेतचा प्रश्न उपस्थित करून सरकारने महिलेच्या सुरक्षिते संबंधी ठोस पाऊले उचलली नसल्याने आज महिलांना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याचे यावेळी सांगितले. आता रामटेक विधानसभेतील सर्व महिलांनी हातात मशाल घेऊन क्रांती घडवण्याचा निर्धार करण्याचे आवाहन त्यांनी महिला मेळाव्यात केले.
यावेळी जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले, जिल्हा संपर्क संघटिका सुषमा साबळे, संपर्क संघटिका सोनाली म्हात्रे, निरीक्षक शालिनी सावंत, निधी शिंदे, मंदाकिनी भावे, वंदना लोणकर, दुर्गा कोचे, मोनिका पौणिकर आदी मेळाव्यास प्रामुख्याने उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.