Nagpur News : एकनाथ शिंदे महायुतीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याच नेतृत्वात महायुती विधानसभेची निवडणूक लढवत आहे. असे असले तरी विरोधक राज्यातील कुठल्याही घटनेला आणि घडामोडींना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरतात. त्यांनाच जाब विचारतात. यावर फडणवीस यांनी माझ्यापासून कोणाला धोका वाटत असावा किंवा राजकीय असुरक्षितता वाटत असावी म्हणून मलाच टार्गेट केले जात असावे, अशी शंका व्यक्त केली. त्यांचा सर्व रोख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे असल्याचा तर्क लावला जात आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सहाव्यांचा विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. यापूर्वी दोन वेळा पश्चिम नागपूर तर तीन वेळा दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभेची निवडणूक लढले आहेत. आजवर ते पराभूत झालेले नाहीत.
काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल गुडधे हे दुसऱ्यांदा त्यांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत. आपण विजयाचा षटकार खेचणार खेचणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहेच. नागपूरची जनता विकासाला मतदान करते. त्यामुळे आपल्या कुठलीच चिंता नसल्याचा दावा त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होती. भाजप -शिवसेना एकत्रित लढल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांचे संबंध ताणल गेले. महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नेत्यांनी फडणवीस यांनाच टार्गेट करणे सुरू केले.
शरद पवार हेसुद्धा फडणवीस यांच्यावरच आरोप करतात. अजित पवार चाळीस आमदार घेऊन महायुतीत सहभागी झाले. याचे सर्व खापर शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडले. लोकसभेच्या निवडणुकीवेळी भाजपचे सर्वाधिक उमेदवार पराभूत झाले होते.
लोकसभा निवडणुकीच्या महायुतीने विश्लेषण केले असता मुस्लिमांची मते शिवसेनेला पडल्याचे आढळले आहे. मुस्लिम समाज नाराज होऊ नये याकरिता उद्धव ठाकरे यांनी हिंदू हृदयसम्राट हा शब्द वापरणे बंद केले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.