KolhaPur News : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमा राजे छत्रपती यांनी माघार घेतल्यानंतर खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी परिपत्रक काढून मोठा खुलासा केला. सामान्य कार्यकर्त्याच्या सन्मानासाठीच विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली असल्याचे सांगितले.
काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करून निवडणूक लढवणे मान्य नसल्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून मधूरीमाराजे छत्रपती यांची उमेदवारी मागे घेण्यात आली. याशिवाय अन्य कोणतेही कारण उमेदवारी मागे घेण्यात नाही. सतेज पाटील आणि आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अपक्ष उमेदवार राजेश लाटकर हे काँग्रेस (Congress) विचाराचे पर्यायाने पुरस्कृत उमेदवार आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही ताकदीने प्रयत्न करणार असल्याची घोषणा खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला नाराज करून निवडणूक लढवणे मान्य नसल्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी मागे घेण्यात आली. याशिवाय अन्य कोणतेही कारण उमेदवारी मागे घेण्यामागे नाही. एका कुट्ंबात दोन पदे नकोत म्हणून मधुरिमाराजे यांनी निवडणूक लढवायची नाही, असे आमचे आधीच ठरले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे त्या कॉँग्रेसच्या मुलाखतीसाठीही गेल्या नव्हत्या. परंतु, राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोध होऊ लागल्यावर एका विशिष्ट परिस्थितीत अनेकांच्या आग्रहास्तव कॉँग्रेस पक्षाची गरज म्हणून त्यांनी उमेदवारी स्वीकारली होती. लाटकर यांनी उमेदवारी मागे घेतली तरच लढ़ायचे असे आमचे ठरले होते. लाटकर कुट्ंबीयांसोबत झालेल्या चर्चेतही आम्ही त्यांच्याजवळ ही गोष्ट स्पष्ट केली होती.
लाटकरांशी झालेल्या भेटीचा वृत्तांत पक्षनेतृत्वाला दिला होता. त्यांनी माघार न घेतल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखावा म्हणून अखेरच्या क्षणी आम्ही माघारीचा निर्णय घेतला. काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणात नसला तरी राजेश लाटकर हे काँग्रेस विचाराचे पर्यायाने काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व ताकदीनिशी प्रयत्न करणार आहोत.
सतेज पाटील (Satej Patil) हे कोल्हापूर जिल्हयाचे काँग्रेसचे नेते आहेत. राज्यपातळीवर नेते म्हणून ते उत्तम काम करीत आहेत. त्यांना ताकद देणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरमधील राजेश लाटकर यांच्यासह जिल्हयातील कॉँग्रेसच्या अन्य चार जागा तसेच महाविकास आघाडीच्या सर्व जागा जिंकण्यासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करणार आहोत.
माघारीनंतरच्या घटनांमध्ये सतेज पाटील यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला. कार्यकत्याना उद्देशून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावरून काही विरोधक आमचा अपमान झाला, असा कांगावा करीत आहेत. प्रत्यक्षात सतेज पाटील यांच्याकडून तसे काही घडलेले नाही. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असेही शाहू महाराज यांनी स्पष्ट केले.
माघारीच्या घटनेनंतर आम्ही भुदरगडच्या कार्यक्रमात एकत्र होतो. तिथून एकाच गाडीतून परत आलो. विधानसभा निवडणुकीच्या माघारीनंतर काही लोक सोशल मीड़ियावर मी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत. त्यात अजिबात तथ्य नाही. कोल्हापूरच्या साडेसात लाखांहन अधिक लोकांनी मला विक्रमी मते देऊन निवड्न दिले आहे. कोल्हापूर जिल्हयाचा प्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेत मी काम करीत आहे आणि कॉँग्रेसचा व महाविकास आघाडीचा खासदार म्हणून लोकांची सेवा करीत राहणार आहे, असे पत्रक खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी माध्यमांना दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.