MP Sunil Mendhe lashed out at the officers : भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांच्यावतीने भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यांत दिव्यांगांना साहित्य वाटप कार्यक्रम आणि जनता दरबार घेण्यात येत आहेत. मोहाडी येथील कौशल्य सभागृहात जनता दरबार घेण्यात आला. यावेळी खासदार मेंढेंनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. (A village servant was also heard well)
अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत खासदारांनी दिव्यांग आणि जनतेच्या समस्यांवर तोडगा काढला. यावेळी सर्वच विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तात्काळ तोडगा निघावा, यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातून नागरिक जनता दरबारात पोहोचले होते. यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
कामात दिरंगाई करतो म्हणून एका ग्रामसेवकालासुद्धा चांगलेच सुनावले. नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे खासदारांनी अधिकाऱ्यांना खडसावल्याने उपस्थित अन्य अधिकारी चांगलेच धास्तावलेले दिसले. यापुढे जनतेच्या कामांमध्ये दिरंगाई आणि वेळकाढूपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, या शब्दांत खासदार मेंढेंनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तंबी दिली.
अधिकारी-कर्मचाऱ्यांचा दरबार..
सर्वसामान्य जनतेला विविध कामे करताना शासकीय कार्यालयामध्ये वारंवार चकरा माराव्या लागतात. तरीही समस्या सुटत नाहीत. जनतेच्या समस्या सुटाव्या, त्यांचे अडचणी दूर व्हाव्या यासाठी भंडारा - गोंदिया लोकसभेचे खासदार सुनील मेंढे यांनी संपूर्ण लोकसभा क्षेत्रात जनता दरबार घेणे सुरू केले आहे.
लाखांदूर येथे सोमवारी (ता. ५ ) रोजी जनता दरबार होता. मात्र, प्रत्यक्षात या जनता दरबारात जनता व तक्रारी दोन्हींचा अभाव होता. त्यामुळे हा जनतेचा नाही, तर अधिकारी-कर्मचाऱ्यांचा दरबार असल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू झाली. जिल्ह्यातील काही भाजप नेत्यांनीही हीच भावना व्यक्त केली. जनता दरबार म्हटले की, अनेक तक्रारी येणे अपेक्षित असते. जनतेकडून आलेल्या समस्या ऐकून घेत, आमने सामने अधिकाऱ्यांना जाब विचारून समस्या मार्गी लावल्या पाहिजेत. पण असे झाले नाही. यासाठी प्रशासनाला दोषी धरण्यात येत आहे.
जनतेच्या समस्यांच्या निराकरणासाठी (Bhandara) भंडारा - गोंदिया (Gondia) लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांनी देखील जनता दरबार कार्यक्रम हाती घेतला असून, दोन्ही जिल्ह्यांत तालुकास्तरावर जनता दरबाराचे आयोजन केले जात आहेत. मात्र, जनतेला जनता दरबार असल्याची माहिती मिळत नसल्याने जनता दरबाराला लोक येत नाहीत. दरबाराचा प्रचार आणि प्रसार प्रशासनाने योग्य पद्धतीने केला नसल्याचीही ओरड होत आहे.
लाखांदूर येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात जनता दरबार व दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता, या कार्यक्रमात तालुक्यातील विविध गावांतील पात्र दिव्यांग बांधवांसह सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सरपंच व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप कार्यक्रम चालू होताच दिव्यांग बांधव मंगल कार्यालयाबाहेर पडून साहित्य वाटप स्थळाकडे गेल्यानंतर जनता दरबारात केवळ अधिकारी, कर्मचाऱ्यांसह स्थानिक भाजप (BJP) पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रशासनाची बेपरवाही..
ज्या सभागृहात हा जनता दरबार घेतला गेला होता, तेथे मोठ्या संख्येने आलेल्या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जागा अडवून बसले होते. मात्र दिव्यांग बांधव सभागृहाच्या आवारात होते. ज्यांची नावे घेतली त्यांनी येऊन गाऱ्हाणे मांडायची आणि दुसऱ्या रस्त्याने निघून जायचे. आलेल्या अनेकांसाठी हा जनता दरबार काहीतरी वेगळाच होता. खरंतर तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना साधी बसण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली नव्हती. आता नाव जनता दरबार आणि या दरबारात जनताच नसेल तर खरंच हा जनता दरबार होता की अधिकारी, कर्मचाऱ्यांचा दरबार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.