Eknath Khadse on BJP Offer: ‘ज्या पक्षात माझा इतका छळ झाला, अनेक चौकश्या लावण्यात आल्या. त्या पक्षाने आता मुख्यंमत्रीपद दिलं तरी मी पुन्हा जाणार नाही. मला दिलेली हिन वागणूक मी अनुभवलेली आहे...’ असं म्हणत आमदार एकनाथ खडसेंनी भाजप नेते विनोद तावडेंची ऑफर थेट धुडकावून लावली. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया ताई यांनी मला पुन्हा राजकारणात आणलं. त्यांनी जर मला राजकारणात आणलं नसतं तर मी कुठेतही उकिरड्यावर असतो. किंवा मी वारकरी सांप्रदायातील असल्यामुळे कुठेतरी टाळ कुटत बसलो असतो. असही एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, 'तावडे आणि मी कित्येक वर्षे एकत्र काम केलं. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. आमच्या सारख्या अनेकांनी भाजपला (BJP) वाढवण्याचं काम केलं. माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी असं आवाहन केलं असावं. पण ज्या पक्षासाठी मी इतकी वर्षे काम केलं. त्याच पक्षात माझा छळ झाला. माझ्यावर भ्रष्टचाराचे आरोप झाले. माझ्याकडून राजीनामा घेतला गेला.अनेक चौकशा लावल्या, अशा पक्षात आता मी पुन्हा जाणार नाही.'
'भाजपने ज्यांच्यावर मोठे-मोठे भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच ते स्वच्छ झाले. पण अडचणीच्या काळात शरद पवारांनी मला विधानपरिषद सदस्य बनवून राजकीय विजनवासातून बाहेर काढले. त्यामुळे आता भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही.’ अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. (BJP Politics)
'भाजपवर मी कधीच टिका केली नाही. पण काही विशिष्ट लोकामुळे मला पक्ष सोडावा लागला. भाजपच्या कोणत्याही नेत्यांवर मी टिका केली नाही. पण काही एक-दोन नेते आजही मला छळत आहेत. ईडी फिडी, असे नतद्रष्ट लोक आहेत त्यांच्यावर माझा रोष आहेत. पण मी इतका कृतघ्न नाही की, पक्षाने मला खुप काही दिलं. पण माझही उभं आयुष्य मी पक्षाला दिलं आहे.' अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.