Ruppes
Ruppes Sarkarnama
विदर्भ

Hingoli Political News: हिंगोलीत 'स्वाभिमानी' आक्रमक; रस्त्यावर नोटा उधळून केलं आंदोलन

सरकारनामा ब्यूरो

Swabhimani Shetkari Sanghtna Agitation : चुकीची औषधे देऊन 'पेस्टिसाइड' कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करतात. ती औषधे वापरल्यानंतर पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. त्याबाबत जिल्हा कृषी अधिकाऱ्यांवार वारंवार माहिती दिली. अधिकाऱ्यांना निवदने देऊनही संबंधितांवर कारवाई होत नाही. त्यामुळे हिंगोलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी चक्क नोटा उधळून कृषी विभागाविरोधात आंदोलन केले. (Marathi Latest News)

हिंगोलीचे पालक मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आहेत. या जिल्ह्यातच झालेल्या अनोख्या आंदोलनाची राज्यभर चर्चा सुरू आहे. हे आंदोलन करताना स्वाभिमानी संघटनेच्या (Swabhimani) कार्यकर्त्यांनी नोटा उधळल्या. त्याचा 'व्हिडिओ' आता 'व्हायरल' होत आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या कारभारावर टीका केली. यावेळी आंदोलकांनी जीव देण्याशिवाय पर्याय नसल्याची उद्विग्न भावना व्यक्त केली.

आंदोलकांच्या म्हणण्यासनुसार, हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात 'पेस्टिसाईट'च्या ७०० हून अधिक कंपन्या आहेत. या कंपन्या औषधांमध्ये काही घातक घटक मिसळले जातात. त्यानंतर त्याची विक्री केली जाते. या औषधांचा वापर केल्यानंतर पिकांवर विपरीत परिणाम होत असल्याचे आढळले. याबाबत काही महिन्यांपासून जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्याकडे मात्र सर्रासपणे दुर्लक्ष केल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला आहे.

आस्मानी-सुलतानी संकटामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे. त्यातच कंपन्या शेतकऱ्यांना जैविक औषध म्हणून घातक औषध देतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे काही जणांपुढे जीव देण्याशिवाय पर्याय उरत नाही. याकडे लक्ष देऊन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशीही मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील फुलंब्री पंचायत समितीवर एका संरपंचाने पैसे उधळून आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या विहिरी व इतर प्रकरणे मंजूर करण्यासाठी गटविकास आधिकारी पैसे मागत असल्याचा आरोप त्यांनी केला. पैसे उधळत, 'हे पैसे घ्या आणि कमी पडले तर आणखी भीक मागून पैसे आणून देतो', असेही ते म्हणाले होते. या प्रकरणाचाही 'व्हिडिओ' सोशल मीडियावर चांगलाच 'व्हायरल' झाला होता.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT