Yogendra Yadav Sarkarnama
विदर्भ

Maharashtra Assembly Election 2024 : स्वराज्य इंडिया भाजपच्या कुठल्या नेत्याला ‘बोल्ड' करणार

Swarajya India Vidhan Sabha Election 2024: स्वराज्य इंडियाचे कार्यकर्त्यांनी मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी राज्यातील 150 मतदारसंघात काम करीत आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : विधानसभेची निवडणूक जाहीर झाली, असतानाही महाविकास आघाडीचे नेते मतदार संघासाठी आपसात भांडत आहेत.

काही जागांसाठी वाद टोकाला गेले आहेत. उमेदवारी मिळेल की नाही याची शाश्वती कोणालाच नाही. या पार्श्वभूमीवर स्वराज्य इंडियाचे कार्यकर्त्यांनी, मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी राज्यातील 150 मतदारसंघात काम करीत आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही 26 मतदार संघात फोकस केला होता. यापैकी 22 मतदारसंघ जिंकले. आता विदर्भातील 40 मतदार संघात आम्ही फोकस केल्याचे स्वराज्य इंडिया पक्षाचे संस्थापक तसेच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी सांगितले.

भाजपकडे (BJP) असंख्य कार्यकर्ते आहेत. संस्थांचे नेटवर्क आहेत. राष्ट्रीय स्वयंकेवक संघाचे पाठबळ आहे. कॅडर कार्यकर्तसुद्धा आहेत. सत्तेत असल्याने सरकारही पाठीशी आहे. दुसरीकडे काँग्रेस फक्त पक्षाच्या बळावर लढा देत आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी ‘एलबीडब्ल्यू‘ करण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरणार आहेत. त्यांना थेट बोल्ड करावे लागणार असल्याचे योगेंद्र यादव यांनी सांगितले.

स्वराज्य इंडिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठीसह एकूण 40 मतदारसंघात काम करीत आहेत. ते आता कोणाला बोल्ड करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा भाजपला होताना दिसत असल्याचे निरीक्षणातून दिसते. मात्र आम्ही महिलांना त्यापेक्षा काँग्रेसची महालक्ष्मी योजना किती चांगली आहे हे पटवून देत आहोत.

संविधानाची मोडतोड भाजपतर्फे सुरवातीपासूनच केली जात आहे. यापूर्वीसुद्धा अनेकदा तसे प्रयत्न झाले. लोकसभेच्या निवडणुकीत संविधानाचा फटका बसल्याने आता भाजपचे नेते सावध झाले आहेत. ते आता या विषयावर उघडपणे बोलत नाही. मात्र त्यांचा हेतू संविधानात बदल करणे हाच आहे. हे आम्ही मतदारांना पटवून देत असल्याचे यादव यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT