Uddhav Thackeray : काँग्रेसचा हट्ट अन् सेनेची धडधड वाढली! उमेदवार नसेल तर उद्धव ठाकरेंच्या स्वागताला नागपूर विमानतळावर कोण जाणार?

Nagpur Assembly Election 2024 : नागपूर शहर राज्याची उपराजधानी आहे. विदर्भाचे प्रमुख शहर आहे. या शहरात ठाकरेंच्या सेनेचे प्रतिनिधित्त्व असणे महत्त्वाचे आहे, असं मत शिवसैनिकांच्यावतीनं व्यक्त करण्यात येत आहे.
uddhav thackeray
uddhav thackeray sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: ठाकरेंच्या शिवसेनेनं सुरुवातीपासूनच नागपूर जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघाची मागणी महाविकास आघाडीकडे केली होती. यापैकी एक शहर आणि एक ग्रामीणमधून जागा सोडावी, असा आग्रह ठाकरेंच्या सेनेचा आहे. मात्र, दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. हा वाद आता मुंबईत पोहचला आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेश प्रभारी चेन्निथाला यांच्या बैठकीत काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सेनेचे संभाव्य उमेदवार प्रमोद मानमोडे यांची यामुळे धडधड वाढली आहे. शहरातून एकही जागा सुटणार नसेल तर उद्धव ठाकरे यांच्यासह नेत्यांच्या स्वागताला नागपूर विमानतळावर कोण जाणार?  असा त्यांचा सवाल आहे.

नागपूर शहर राज्याची उपराजधानी आहे. विदर्भाचे प्रमुख शहर आहे. या शहरात ठाकरेंच्या सेनेचे प्रतिनिधित्त्व असणे महत्त्वाचे आहे. शिवसेनेचा ( Shivsena ) उमेदवार आजवर जिंकला किंवा नाही, हा प्रश्न नाही. भाजपसोबत युती असताना शिवसेनेचे शहरात दोन आणि ग्रामीणमधील दोन मतदारसंघात लढत होती. भाजपच्या विजयात महत्त्वाचा वाटा होता. रामटेकमध्ये खासदारही होते. नागपूर शहरातूनच शिवसेना संपूर्ण विदर्भात फोफावली, असा दावा शिवसैनिकांच्यावतीने केला जात आहे. 

uddhav thackeray
Congress Vs Shivsena : वाद मिटेना! एकही मतदारसंघ ठाकरेंना दिल्यास ‘सांगली पॅटर्न’चा काँग्रेसचा इशारा

दक्षिण, पूर्व आणि मध्य नागपूर, अशा तीन मतदारसंघाचे प्रस्ताव शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे ठेवले होते. यापैकी दक्षिण सर्वांचा भर होता. जिल्हाध्यक्ष प्रमोद मानमोडे आणि जिल्हाध्यक्ष किशोर कुमेरिया हे दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी आग्रही आहेत. युतीत असताना 20 वर्षांपूर्वी पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना लढत होती. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे यांनी या मतदारसंघातून 90 हजार मते घेतली होती. त्यामुळे त्यांची लढत काँग्रेसचे बलाढ्य नेते सतीश चतुर्वेदी यांच्यासोबत झाली आहे.

uddhav thackeray
Nana Patole On Sanjay Raut: 'मविआ'त खटक्यावर खटके; आधी राऊत, आता पटोले; म्हणाले, 'ते कदाचित ठाकरेंपेक्षा मोठे नेते...'

मुस्लीम, हलबा आणि अनुसूचित जाती जमातीचे गणित मांडून मध्य नागपूरमधील इच्छुकांनी हाच मतदारसंघ महाविकास आघाडीसाठी अनुकूल असल्याचे मत मांडले आहे. हे बघता दक्षिण सोडण्यास काँग्रेसने नकार दिल्यास उर्वरित दोनपैकी कुठला मतदारसंघ ठाकरेंच्या सेनेच्या वाट्याला येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसने शहर सोडून ग्रामीणमध्ये दोन मतदारसंघ लढावे, अशी सूचना केली असल्याचे समजते. मात्र, ग्रामीणमधील काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी यास ठाम नकार दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com