Nagpur Assembly Elections : काँग्रेस आक्रमक होताच दक्षिण नागपूर होल्डवर, ठाकरेंच्या शिवसेनेत अस्वस्थता

Dispute in MVA over South Nagpur Constituency : दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघावरुन काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात चांगलाच वाद रंगला आहे. ठाकरेंची शिवसेना या मतदारसंघावरील आपला दावा सोडायला तयार नाही. तर काँग्रेसही या जागेसाठी आक्रमक झाली आहे.
Nana Patole, Sanjay Raut, Uddhav Thackeray
Nana Patole, Sanjay Raut, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 18 Oct : दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघावरुन काँग्रेस आणि शिवसेना (Shivsena UBT) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात चांगलाच वाद रंगला आहे. ठाकरेंची शिवसेना या मतदारसंघावरील आपला दावा सोडायला तयार नाही. तर काँग्रेसही या जागेसाठी आक्रमक झाली आहे.

मुंबईत जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू असतानाच काँग्रेसचे संभाव्य उमेदवार गिरीश पांडव यांनी तातडीने कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला होता. मात्र, हा मतदारसंघ होल्डवर ठेवण्याचा संदेश येताच त्यांनी हा मेळावा स्थगित केला.

यावरून या मतदारसंघासाठी महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) टोकाचे मतभेद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. ठाकरेंची शिवसेना सुरुवातीपासूनच दक्षिण नागपूरसाठी आग्रही आहे. भाजपसोबत युती असताना हा मतदारसंघ शिवसेना लढवत होती. मात्र, सेनेला आतापर्यंत हा मतदारसंघ जिंकता आला नाही.

Nana Patole, Sanjay Raut, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : दीपकआबांचा प्रवेश अन् रूग्णालयातून आल्यानंतर पहिलंच भाषण, उद्धव ठाकरे कडाडले; म्हणाले, “आधी ह*****”

युती, आघाडी तुटल्यानंतर भाजपने दक्षिण सर केले. सध्या भाजपचे मोहन मते या मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत मते विरुद्ध गिरीश पांडव असा सामना रंगला होता. त्यांच्यात अतिशय अटीतटीची लढत झाली होती. मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत चुरस रंगली होती. पांडव अवघ्या साडेचार हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले होते.

पांडव यांच्या विजयाला अवघी चार हजार मते अपुरी पडली. याच निवडणुकीत शिवसेनेचे (Shivsena) जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया आणि दुसरे जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोडे हेसुद्धा निवडणूक लढले होते. कुमेरिया यांना 4 हजार 400 तर मानमोडे यांना 4 हजार 200 मते पडली होती. निकालाची ही आकडेवारी समोर ठेऊन काँग्रेसने (Congress) दक्षिणेवर मेरिटनुसार आपला दावा सांगितला आहे.

Nana Patole, Sanjay Raut, Uddhav Thackeray
Top 10 Political News : अजितदादांचा वादा अन् दीपक मानकरांचे बंड झाले थंड ; शिवसेनेचा उमेदवार घेणार तुतारी! - वाचा महत्त्वाच्या घडोमोडी

पराभूत झाल्यानंतर गिरीश पांडव यांनी मतदारसंघ सोडला नाही. पाच वर्षांपासून ते मतदारांच्या संपर्कात आहेत. सर्वच उत्सावंमध्ये त्यांचा सहभाग आहे. ही जागा उद्धव सेनेला सोडल्यास येथे बंडखोरीची शक्यताही वर्तविली जात आहे. अशातच आज सकाळी या जागेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचे खटके उडाले.

राऊतांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. गिरीश पांडव यांनी काँग्रेसचा मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करण्याचे ठवरले होते. मेळाव्याचे स्थळ आणि वेळ कार्यकर्त्यांना कळवण्यात आले होते. या जागेवर वाद वाढत असल्याचे दिसतात दक्षिण नागपूर महाविकास आघाडीने होल्डवर ठेवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com