Ravi Rana, Uddhav Thackeray
Ravi Rana, Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Ravi Rana on MVA : महाविकास आघाडी तुटून ठाकरे एकटे राहतील; रवि राणांनी सांगितलं कारण

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Politics : महविकास आघाडीसोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांची आधीच फजिती झालेली आहे. आता महाविकास आघाडीत मतभेद वाढत असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे भविष्यात उद्धव ठाकरे यांची मोठी फजिती होणार आहे, अशी टीका आमदार रवि राणा यांनी केली आहे.

महाविकास आघाडीत (MVA) विविध मुद्द्यांवर मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. त्यात सावरकर, जेपीसी, अदानी, ईव्हीएम आदी विषयांचा समावेश आहे. दरम्यान शरद पवार (Sharad Pawar) यांनी या मुद्द्यांवर आपली वेगळी मते व्यक्त केल्याने आघाडीत एकवाक्यता नसल्याचे चर्चा होऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पवारांची भेट घेतली. ये भेटीनंतर ठाकरेंवर भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी टीका करण्यास सुरूवात केली.

आमदार रवि राणा (Ravi Rana) म्हणाले, "महाविकास आघाडीसोबत गेल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आधीच फजिती झालेली आहे. त्यातच ठाकरेही भाजपविरुद्ध काँग्रेसची भाषा बोलू लागले आहेत. ठाकरेंच्या या वक्तव्यांना जेपीसी, ईव्हीएम, अदानी मुद्द्यांवरून शरद पवारांनी 'ब्रेक' दिला आहे. यामुळे ठाकरेंची मोठी गोची झाली. काँग्रेसही आपली भूमिका मांडतेय. त्यामुळे महविकास आघाडीत लवकरच बिघाडी होणार आहे. त्यातूनच अस्तित्व वाचविण्यासाठी ठाकरेंनी सिल्व्हर ओकवर धाव घेतली. शेवटी महाविकास आघाडीत तुटून उद्धव ठाकरे एकटे राहतील."

अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार का, यावर आमदार राणा यांनी सावध भूमिका घेतली. राणा म्हणाले,"अजंली दमानिया या आपच्या प्रवक्त्या आहेत. टीका करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. 'ईडी'च्या माध्यमातून कुणावरही दबाव आणला जात नाही. 'ईडी' आतापर्यंत निपक्षपणे काम करत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे राज्याचे नेते आहेत. ते वेळ काळ पाहून योग्य निर्णय घेतात. सध्या ते आघाडीत कंटाळलेले आहेत. त्यामुळे त्यांनी भविष्यात निर्णय घेतला तर अश्चर्य वाटायला नको."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT