<div class="paragraphs"><p>foreign liquor</p></div>

foreign liquor

 

sarkarnama

विदर्भ

मद्य प्रेमींसाठी 'गुड न्यूज'; नववर्ष होणार स्वत विदेशी दारु सोबत साजरे

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : नव्या वर्षाच्या स्वागतात ओमिक्रॉनचा अडथळा घातला असला तरी अनेकांनी जोरात तयारी केली आहे. नव वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात होत असते. अनेक जण मद्यसोबतच नववर्षांचे स्वागत करत असतात. काळात मद्य विक्रीही मोठ्या प्रमाणात होते. अशा मद्य प्रेमींसाठी काही जल्लोषात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) आयातीत विदेशी मद्यावरील कर कमी केल्याने ती स्वस्त होणार आहेत. हे नव्या दराचे मद्य नव्या वर्षापूर्वीच बाजारात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोरोनामुळे (corona) सरकारच्या उत्पन्नावर परिणाम झाला. मद्याचे चाहते लक्षात घेता सरकारने आयातीत विदेशी मद्यावरील करात मोठी वाढ केली होती. स्कॉच, व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क तीनशे टक्के केले होते. मात्र, राज्य सरकारने आयात केलेल्या स्कॉच, व्हिस्कीसह काही मद्यावरील उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात केली. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात विक्री केल्या जाणाऱ्या स्कॉच, व्हिस्कीची किंमत इतर राज्यांतील किंमतीएवढी झाली. दर कमी केल्याने अवैध विक्रीला आळा बसणार असून महसुलात वाढ होणार असल्याचा दावा, अर्थमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून राज्य सरकारला शेकडो कोटींचा महसूल मिळतो. या शुल्क कपातीमुळे सरकारचा महसुलात २०० ते २५० कोटींची भर पडण्याची शक्यता आहे. दर कमी करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील आयात मद्याचे दर कमी झाले. तसेच इतर राज्यांच्या बरोबरीने आणले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाने मद्याचे दर निश्चित केले. निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडे त्याची माहिती दिली आहे. कंपन्यांकडून नव्या सुधारित दरानुसार मद्य विक्री होणार आहे. नव वर्षाला होणार जल्लोषालाच नव्या दराचे मद्य बाजारत येणार असल्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.

दर कमी झालेले दारूचे नवीन दर

जॉनी वॉकर ब्लॅक लेबल ब्लेंडेड स्कॉच व्हिस्कीची जुनी किंमत ५ हजार ७६० रुपचे होती. ता आता ३ हजार ७५० रुपयांना मिळेल. जॉनी वॉकर रेड लेबल मिश्रित स्कॉच व्हिस्की पूर्वी ३ हजार ०६० रुपयांनी मिळायची ती आता १ हजार ९५० रुपयांना मिळेल. J&B दुर्मिळ मिश्रित स्कॉच व्हिस्की पूर्वी ३ हजार ०६० रुपयांची मिळायची ती आता २ हजार १०० रुपयांना मिळेल. जेमसन ट्रिपल डिस्टिल्ड आयरिश व्हिस्की ३ हजार ८०० रुपयांना मिळत होती. आता २ हजार ५०० रुपयांची झाली आहे. ब्लँटायरची उत्कृष्ट मिश्रित स्कॉच व्हिस्की ३ हजार ०७५ रुपयांवरून २ हजार १०० रुपयांची झाली आहे. १२ वर्षे जुनी चिवास रीगल मिश्रित स्कॉच व्हिस्की पूर्वी ५ हजार ८५० रुपयांची होती. आता ३ हजार ८५० ची झाली आहे. जॉर्डन्स लंडन ड्राय जीन २ हजार ४०० रुपयांवरून १ हजार ६५० रुपयांची झाली आहे.

मद्यपींनी ७ महिन्यात रिचवली २ कोटी लिटर

मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी विक्रीत वाढ झाली आहे. यावर्षी एप्रिल ते ऑक्टोंबर या ७ महिन्यात २ कोटी ४ लाख लिटरच्यावर मद्याची विक्री झाली आहे. यातून २५४ कोटी ८२ लाख ८ हजार रुपयांचा महसूल सरकारला मिळाला आहे. यात सर्वाधिक १ कोटी ३२ लाख लिटर देशीचा समावेश आहे. तर ७० लाख ८० हजार लिटर विदेशी मद्याची विक्री झाली. मागील वर्षी याच काळात विक्री दोन कोटी लिटर पेक्षा कमी होती. तर २४८ कोटी ७० लाख ९ हजारांचा महसूल मिळाला होता. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी देशीच्या विक्रीत घट झाली असून विदेशी मद्याची विक्री जास्त आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT