नितेश राणेंना अटक होणार? नारायण राणेंनीच दिले संकेत

संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य संशयीत आरोपी सचिन सातपुते याला अटक करण्यात आली आहे.
Nilesh Rane, Narayan Rane

Nilesh Rane, Narayan Rane

sarkarnama

Published on
Updated on

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4 नगर पंचायती व जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता येणार आहे. हे लक्षात आल्यानंतर सूड भावनेने महानिकास आघाडी सरकार कारवाई करत असल्याचा, आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे. कणकवलीमध्ये घडलेल्या मारहाणीच्या घटनेमध्ये भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) व गोट्या सावत यांचा संबंध लावून पोलिस अधिकाराचा गैरवापर करत आहेत. नितेश व माजी जिल्हा अध्यक्ष संदेश सावंत यांना चौकशीसाठी बोलून अटकेसाठी प्रयत्न करत आहेत, असा खळबळजणक आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

<div class="paragraphs"><p>Nilesh Rane, Narayan Rane</p></div>
अजित पवारांनी राज्यपालांना करुन दिली परंपरेची आठवण...

कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. यावेळी राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टीका केली. राज्यीतल आघाडी सरकार हे बळाचा व अधिकाराचा गैरवापर करून नाहक प्रकरणात नितेश राणे यांना गोवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पोलिसांनी लक्षात ठेवा केंद्रामध्ये आमची सत्ता आहे. जर चुकीच्या पद्धतीने पोलिस वागत असतील तर जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढू. त्यामुळे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर करू नये, असा इशारा राणे यांनी दिला.

संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य संशयीत आरोपी सचिन सातपुते याला अटक करण्यात आली आहे. सचिन सातपुते याला सिंधुदूर्ग ग्रामिण पोलिसांनी दिल्लीमधून मोठ्या शिताफीने अटक केली. मुख्य आरोपी सचिन सातपुते हा भाजप आमदार नीतेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यानंतर नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

<div class="paragraphs"><p>Nilesh Rane, Narayan Rane</p></div>
सकाळी राणेंसोबत बैठक अन् दुपारी अजितदादा स्टेजवरूनच म्हणाले , महाभाग!

अजित पवार यांच्यावर टीका

मी 100 कोटी देऊन जा म्हणालो होतो. लघुपाटबंधारेचे टेंडर झाले नाही. तेरा कोटी मागितले होते त्या पैकी 6 कोटी आले. मात्र, एकही रुपया खर्च झाला नाही. बजेटची भाषा करतात त्यांना बजेट अर्थात अर्थसंकल्प नेमका समजतो का? असा उपरोधिक टोला राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लावला.

त्यांच्या कार्यकर्त्यांनाच पवार अक्कल लागते म्हणाले. त्यांनीच भ्रष्टाचार केला. संचयनी सारख्या गोष्टीत भ्रष्टाचार केला. कारभार करण्यासाठी अक्कल लागते. जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी अकलेचे काय तारे तोडलेत हे जनतेला आता कळून चुकले आहे, अशी टीका पवार यांच्यावर राणे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com