Amravati News : अमरावती शहरातील राठीनगर परिसरात नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या घरी पिस्तूल आणि चाकुचा धाक दाखवून पाच लाखांची लुटीचा प्रकार घडला. या प्रकारामुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी अकराच्या सुमारास घडली. आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यांना शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
अधिक माहितीनुसार,नायब तहसीलदार प्रशांत अडसूळांच्या पत्नी घरी एकट्याच होत्या. त्यावेळी दोन तरुण तोंडाला रुमाल बांधून घरी आले होते. त्यांनी जनगणनेच काम करत असल्याचे सांगितले. त्यांनी अडसूळ यांना कुटुंबियांची माहिती देण्याची विनंती केली. त्यानंतर पिण्यासाठी पाणी मागितले. तसेच आधार कार्ड दाखवा असे सांगितले. त्यानुसार अडसूळ आधारकार्ड आणण्यासाठी घरात जाताच त्यांच्या गळ्याला त्या दोघांनी चाकू लावला. (Amaravati)
अडसूळ यांना चाकूचा धाक दाखवून घरात बांधून ठेवले. तसेच बंदुकीचा धाक दाखवत घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा पाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला. त्यानंतर अडसूळ यांनी गाडगेनगर पोलिस (Police) ठाण्यात जात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी चार पथके रवाना केलेली आहेत. घरात येताना हे आरोपी सीसीटीव्हीत कैद झालेले आहेत. मात्र तोंडाला रुमाल असल्याने त्यांना शोधून काढणे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, राज्यभर मराठा आरक्षणाचे सर्व्हे सुरू आहे. त्यामुळे गावागावात अनेक कर्मचारी नागरिकांच्या घरी जाऊन माहिती घेत आहेत. मात्र ते लोक शासकीय आहे का, हे आता सामान्य नागरिकांना ओळखणे कठीण झाले आहे. सर्व्हेचे नाव सांगून आता नागरिकांना लुटण्याचा प्रकार अमरावती शहरामध्ये समोर आला आहे. त्यामुळे सर्व्हेसाठी कोणीही घरी आल्यास त्यांना घरात घेऊ नये. त्यांना बाहेरूनच माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी दिले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.