Konkan Politics : रत्नागिरीत मोठा राजकीय भूकंप? किरण सामंतांनी घेतली वडेट्टीवारांची भेट

Uday Samant Political News : शिवसेनेकडून (शिंदे गट) किरण सामंत यांचे नाव चर्चेत असले तरी...
Eknath Shinde Kiran Samant
Eknath Shinde Kiran SamantSarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची मुंबई येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याने कोकणात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.या भेटीने पुन्हा एकदा कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून वर्तवली जात आहे. किरण सामंत अलीकडे नाराज असल्याची चर्चा आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी किरण सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून इच्छुक उमेदवार मात्र या जागेवर भाजपकडून प्रबळ दावा करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

Eknath Shinde Kiran Samant
Manoj Jarange News : मोठी बातमी! मनोज जरांगेंनी केली नवीन घोषणा, 10 फेब्रुवारीपासून...

अलिकडेच फेसबुकवरती पोस्ट करून त्यानंतर डिलीट केल्यामुळे आधीच चर्चेत आलेल्या किरण सामंत यांच्या विरोधीपक्षातील नेत्याच्या राजकीय भेटीने मोठी खळबळ उडाली आहे. सामंत यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या व्हाट्स अप स्टेटसवरती मशालीचा फोटो ठेवला होता, तेव्हापासून ते चर्चेत आले आहेत.

शिवसेनेचे शिंदे गटाकडून किरण सामंत यांचे नाव चर्चेत असले तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती भाजपाने आपला प्रबळ दावा केला आहे. भाजपकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांचे नाव चर्चेत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही या जागेवरून कोणीही भाष्य अथवा बॅनरबाजी करू नये अशा शब्दात कान टोचले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी किरण सामंत (Kiran Samant) यांनी केलेल्या या फेसबुक पोस्ट एक्स वर टाकून 'सामंत बंधूंनी एकत्रच राहावे कोणाचेही घर फुटू नये यासाठी प्रयत्न करावे ही शिकवण पवार साहेबांची आहे. अशा स्वरूपाची या दोन्ही भावांमध्ये वाद झाले असल्याची दर्शवणारी पोस्ट दोन दिवसापूर्वी एक्स वर केली आहे. त्यामुळे या सगळ्या विषयावरून किरण सामंत यांची नाराजी नक्की कोणावर ? याबाबत आता जिल्ह्यात वेगळ्या चर्चा सुरू आहेत.

दरम्यान, अलिकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांचे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून चर्चेत असतानाच अलीकडे राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघावरती किरण सामंत यांची सुकन्या अपूर्वा किरण सामंत यांनीही भेटीगाठी व राजकीय दौरे सुरू केल्याने राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघावरही लक्ष ठेवून असल्याची चर्चा आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Eknath Shinde Kiran Samant
Manoj Jarange News : मोठी बातमी! मनोज जरांगेंनी केली नवीन घोषणा, 10 फेब्रुवारीपासून...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com