Leaders in Bhandara & Gondia. Sarkarnama
विदर्भ

Lok Sabha Election 2024 : निवडणुकीचे वारे जोरात; मेंढे, फुके, पटेल, पटोलेंचे दौरे वाढले

अभिजीत घोरमारे

Bhandara-Gondia Constituency : भंडारा- गोंदिया जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. त्यादृष्टीने इच्छुकांकडून तयारीही सुरू झाली आहे. जिल्ह्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत कार्यक्रम, मेळावे, भूमिपूजनाचा सपाटाच लावला आहे.

निवडणुकीच्या दृष्टीने कार्यक्रम घेण्याबाबत विद्यमान भाजप खासदार सुनील मेंढे सर्वांत पुढे आहेत. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष राज्यसभा खासदार प्रफुल पटेल व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, माजी मंत्री डॉ. परिणय फुके हे देखील या पंगतीत सामिल झाले आहेत.

गेल्या दीड वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांच्या मदतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम राजकीय पक्षांनी सुरू केले आहे. सत्ताधाऱ्यांद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचविली जात आहे. राजकीय नेत्यांचे दौरेही सध्या वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात रेचलेच वाढली आहे.

गावागावांत नेत्यांचे संपर्क दौरे सुरू झाले आहेत. विकासकामांचा धडाका सुरू आहे. अनेक ठिकाणी नाटक, मंडई, मेळावेही आयोजित करत स्थानिक पातळीवरील मतदारांपर्यंत पोहचण्याचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. या सर्व घडामोडी लक्षात घेता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्याचे मतदारांनाही स्पष्टपणे जाणवत आहे. लोकसभेसाठी नेत्यांना गावपातळीवरील कार्यकर्त्यांना घेऊनच कामे करावे लागणार आहे. त्यांच्या बळावरच गावागावांत विकासकामांचे उद्घाटन केले जात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक सध्यातरी होणार नसल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता लोकसभेसाठी, त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काम करायचे असे कार्यकर्त्यांनीही ठरवून टाकले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणूक लढविण्याची आपली इच्छा बाजूला ठेवत कार्यकर्ते पुन्हा कामाला लागले आहेत. अशात विद्यमान खासदार सुनील मेंढे, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार नाना पटोले यांचे जिल्ह्यातील दौरे सर्वाधिक वाढले आहेत.

सध्या हे तीनही नेते आपापल्या पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सतत संपर्कात आहेत. भंडारा-गोंदियातून भाजपचे सुनील मेंढे यांना तयारीत राहण्याचे आदेश मिळाले आहेत. खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री डॉ. परिणय फुके, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे नावही निवडणुकीसाठी चर्चेत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT