Gondia Shoot Out : माजी नगरसेवक यादव यांना मारण्यासाठी 40 लाखांची सुपारी

Lokesh Alias Kallu Yadav : आठवडाभर रेकी केल्यानंतर गोळीबार; सहा जणांना अटक
Lokesh Kallu Yadav Gondia.
Lokesh Kallu Yadav Gondia.Sarkarnama
Published on
Updated on

Political Crime : गोंदिया शहरातील माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव गोळीबार प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आर्थिक व्यवहारातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. यादव यांना मारण्यासाठी तब्बल 40 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. गोळीबार प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

प्रशांत मेश्राम हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. प्रशांत आणि आणखी एक फरार आहे. गणेश शिवकुमार शर्मा (वय 21, रा. भिंडी ले-आउट वरोडा, ता. कळमेश्वर, जि. नागपूर), अक्षय मधुकर मानकर (वय 28, रा. सम्राट ग्राउंड, शिक्षक कॉलनी, कळमेश्वर, जि. नागपूर), धनराज ऊर्फ रिंकू व राजेंद्र राऊत (वय 32, रा. कुंभारेनगर, गोंदिया), नागसेन बोधी मंतो (वय 41, रा. गौतम बुद्ध वाॅर्ड, श्रीनगर गोंदिया), शुभम विजय हुमने (वय 27, रा. भीमनगर, गोंदिया) व सुमित ऊर्फ पंछी विकास डोंगरे (वय 23, रा. कुंभारेनगर, गोंदिया) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Lokesh Kallu Yadav Gondia.
Gondia : उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक लोकेश ऊर्फ कल्लू यादव यांच्यावर गोळीबार

प्रशांत आणि रोहित मेश्राम (रा. गोंदिया ह., मु. कळमेश्वर, जि. नागपूर) यांचा शोध पोलिस घेत आहेत. गोंदिया शहरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव (वय 42, रा. बाराखोली, सिंधी कॉलनी, गोंदिया) यांच्यावर गुरुवारी (ता. 11) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला होता. यादव यांना मारण्यासाठी आरोपींना 40 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती.

गोळीबार करणाऱ्यांनी प्रकरणातील आरोपींना फक्त पाच हजार रुपये देण्यात आले होते. आर्थिक व्यवहाराचा हा वाद आहे. सुपारी घेणाऱ्यांनी आपल्यावर संशय येऊ नये यासाठी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसलेल्या तरुणांची निवड केली. सुपारीच्या 40 लाखांपैकी फक्त पाच हजार रुपये आणि बंदूक आरोपींपर्यंत पोहोचविण्यात आली. काम झाल्यावरच उर्वरित पैसे दिले जातील, असे ठरले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुपारी मिळाल्यानंतर आरोपींनी गोंदियात आठ दिवस मुक्काम केला. आठवडाभरात कल्लू यादव कुठे राहतात, कुठे जातात, कोणत्या वाहनाने जातात, त्यांच्यासोबत कोण असते, कामाची कोणती वेळ आहे, एकापेक्षा जास्त लोक असले तर कोणत्या पद्धतीने गोळीबार करायचा, याची प्लॅनिंग आरोपींनी आठवडाभर केली.

गोंदियात आरोपींनी राहण्याची कोणतीही सोय नव्हती. त्यामुळे नागसेन बोधी मंतो याच्या घरी आरोपी थांबले होते. गोंदियातील एका लॉजमध्येही त्यांचा मुक्काम होता. आठ दिवस गोंदियात राहून त्यांनी रेकी केली. ठरलेल्या दिवशी यादव यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. यात यादव यांच्या कमरेला गोळी लागली. सध्या यादव यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत.

Lokesh Kallu Yadav Gondia.
Gondia : धुळे एसआरपीएफ पोलिसाविरुद्ध सालेकसात गुन्हा दाखल; बंदूक घेत दिली...

पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे बयाण, खबऱ्यांची माहिती गोळा केली. त्या आधारावर आरोपींना शोधण्यात आले. पोलिसांनी या आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना 22 जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत निष्पन्न झालेल्या आरोपींची संख्या आठ झाली आहे. दोघांचा शोध अद्यापही सुरू आहे. यादव यांना मारण्याची सुपारी देणारा कोण होता, याचा शोध पोलिस घेत आहेत.'

Edited By : Prasannaa Jakate

R...

Lokesh Kallu Yadav Gondia.
Gondia : रोखण्याऐवजी बापानेच गुन्ह्याकडे लोटले; वादातून मुलांच्या मित्राला कायमचे संपविले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com