Prataprao Jadhav, Sanjay Raymulkar and Ravikant Tupkar Sarkarnama
विदर्भ

Tupkar Vs Jadhav: भाडोत्री गुंड न पाठवता माझ्याशी दोन हात करा !

जयेश विनायकराव गावंडे

Buldhana Ravikant Tupkar speech: शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय रायमूलकर यांनी कानाखाली मारण्याची धमकी तुपकरांना दिल्यानंतर बुलढाण्यात निवडणूकीपूर्वीच राजकारण चांगलंच तापलं आहे. तुपकरांनी आता थेट आवाहन खासदार प्रतापराव जाधव आणि संजय रायमूलकर यांना केलं आहे.

तुपकर म्हणाले, भाडोत्री गुंड न पाठवता माझ्याशी दोन हात करायला या माझी तयारी आहे. तुपकरांनी भर सभेत हे वक्तव्य केले आहे. तुपकरांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे बुलढाण्यात राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे.

बुलढाण्यात सध्या शिवसेना शिंदे गटाचे खासदार जाधव, आमदार रायमूलकर आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यात हा सामना रंगला आहे. पूर्वी शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर यांनी वादग्रस्त विधान केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या कानाखाली आवाज काढावा लागेल, असे रायमुलकर यांनी जाहीर सभेतून म्हटले. त्यानंतर तुपकरांनी यावर प्रतिक्रिया देत असल्या पांचट धमक्यांना घाबरत नसल्याचे म्हटले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात लढणार असल्याचं घोषित करताच. सभा घेणं सुरू केलं आहे. अशाच एका सभेत तुपकर यांनी पुन्हा प्रतापराव खासदार जाधव आणि आमदार रायमूलकर यांना डिवचले आहे. एका सभेत बोलताना रविकांत तुपकर म्हणाले, मला तुरुंगात टाकायची सरकारकडून प्लानिंग सुरू आहे. लोकसभा निवडणुकीपासून बाजूला ठेवायचं म्हणून 1 वर्ष तुरुंगात ठेवण्याची मागणी सरकारने कोर्टात केली आहे.

मला तडीपार करायचं प्लानिंग सुरू असल्याचा दावा तुपकर यांनी केला आहे. माझ्यावर झोपडपट्टी दादा अॅक्ट लावायची तय्यारी सुरू असल्याचे ते म्हणाले, यावेळी त्यांनी खासदार जाधव आणि आमदार रायमूलकर यांनाही खुले आवाहन दिलं आहे. ते म्हणाले भाडोत्री गुंड न पाठवता हिम्मत असेल तर खासदार आणि आमदाराने माझ्याशी दोन हात करावे त्यासाठी माझी तयारी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

15 वर्ष खासदार,15 वर्ष आमदार राहिलेले प्रतापराव जाधव माझ्या विरोधात भाषण देत असतील तर समजून घ्या मी त्यांना किती हातघाईस आणलं असेल, असेही तुपकर म्हणाले. मला तुरुंगात टाका,फासावर चढवा,जेलात टाका, तुरुंगातून लोकसभा लढविणार पण थांबणार नाही, असंही तुपकर यांनी म्हटलं आहे. रविकांत तुपकर यांनी शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांना खुलं आव्हान दिल्यानंतर समोरून काय प्रतिक्रिया येतात, हे पाहावे लागणार आहे. मात्र या नेत्यांच्या वादामुळे बुलढाण्यात निवडणूकीपूर्वी राजकारण चांगलंच तापलं, हे मात्र निश्चित.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT