Uddhav Thackeray, Narendra Modi Sarkarnama
विदर्भ

Jammu Kashmir : मोदींनी आता काश्मिरी पंडितांची गॅरंटी घ्यावी; 370 रद्दनंतर ठाकरे असं का म्हणाले ?

Uddhav Thackeray To Narendra Modi : निवडणुकीपूर्वी POK ताब्यात घेण्याचे ठाकरेंचे आवाहन

Sunil Balasaheb Dhumal

Nagpur Winter Session : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय योग्यच असल्याचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगालाही आदेश दिला आहे. या निर्णयाचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वागत केले आहे. तसेच त्यांनी काश्मिरी पंडितांचाही मुद्दा छेडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या काश्मिरी पंडितांची गॅरंटी घ्यावी, असे आवाहन ठाकरेंनी केले आहे.

कलम 370 रद्द करण्याचा निर्णय योग्यच असल्याचे सांगून कोर्टाने केंद्र सरकारला 30 सप्टेंबर 2024 पूर्वी विधानसभेच्या निवडणुका घेण्याचेही आदेश दिले आहेत. यावर बोलताना ठाकरेंनी पाकिस्तान व्याप्त काश्मिर ताब्यात घेऊन तेथेही निवडणुका घेण्याचे आव्हान केले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, कोर्टाने कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय योग्यच असल्याचे म्हटले आहे. या मुद्द्यावर आमचाही सरकारला पाठिंबा होता. आता निवडणुका घेण्याचेही आदेश आहेत. निवडणुकापूर्वीच पाकिस्तान व्याप्त काश्मिरही ताब्यात घ्यावा. तेथेही निवडणुका घ्यावात. तसेच विस्थापित काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाची जबाबदारीही पार पाडावी, असे ठाकरे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान मोदींनी काश्मिरी पंडितांची गॅरंटी घेतली पाहिजे, असे आवाहन ठाकरेंनी केले. 'ठाकरे म्हणाले, सध्या गॅरंटीचा जमाना आहे. मोदी गॅरंटी पूर्ण करण्याची गॅरंटी देतात. त्याला मोदी गॅरंटी म्हणतात. आता निवडणुकीपूर्वी विस्थापित काश्मिरी पंडित निवडणुकीसाठी मतदान करायला आपापल्या घरी परततील, याची मोदी गॅरंटी घेतील का ? तेथील खुल्या वातावरणात ते मतदान करतील, याचीही त्यांनी गॅरंटी घ्यावी.'

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT