Nagpur Session 2023 : उद्धव ठाकरेंना आता जनता 'धुणार'; मुख्यमंत्री शिंदे यांची टीका

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : बीच क्लिन ड्राईव्ह' मोहीम मुंबईसाठी आवश्यक
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Winter Session : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर 'हाथ की सफाई' केल्याचा आरोप करत टायमिंग साधले आहे. या आरोपाचे पडसाद अधिवेशनात उमटणार, असे दिसत आहे.

मुख्यमंत्री शिंदेंनी 'बीच क्लिन ड्राईव्ह' ही माझी संकल्पना असून, ती मुंबईसाठी आवश्यक आहे. एकाचवेळी मुंबई प्रभागातील चार ते पाच हजार लोकांना एकत्रित करत त्या प्रभागातील सर्व सार्वजनिक ठिकाणांची सफाई करायची, अशी ही संकल्पना आहे.' या 'बीच क्लिन ड्राईव्ह'वर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. यावर मुख्यमंत्री शिंदेंनी यांनी सडेतोड उत्तर देत अर्धवट माहिती घेऊन उद्धव ठाकरे बोलत आहे, असे म्हटले आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Rajesh Kshirsagar : माजी आमदाराचं शेजाऱ्यांशी भांडण; मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल..

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "आम्ही सफाई करतो आहे. रस्त्यांची सफाई करतोय. बीचची सफाई करतोय. त्यांनी तर 'हाथ की सफाई' केली. नाल्यामध्ये केली. तिजोरीची सफाई केली. रस्ते धूत आहोत, तर त्यांना ते देखील आवडत नाही. त्यांनी तिजोरी धुतली. आम्ही रस्ते धुतोय. येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना धुतल्याशिवाय राहणार नाही".

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकाच दिवशी प्रभागातील सर्व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता कराची, अशी ही मोहीम आहे. चौपाटी देखील गेलो होतो. तेथे स्वच्छता मोहीम राबवली. त्यांनी माहिती घेऊन बोलालया पाहिजे होते. त्यांनी अर्धवट माहिती घेतली आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे ठाकेंवर टीका करताना म्हणाले. यामुळे अधिवेशनात ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

कांदा प्रश्नी केंद्रातून लवकरच निर्णय

विरोधकांनी अधिवेशनाच्या आजच्या कामकाजाच्या सुरूवातीलाच कांदा निर्यात बंदीवरून जोरदार घोषणाबाजी केली. यातच कांदा निर्यातीवर बंदी घातल्याच्या मुद्यावर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी बोललो आहे. मंत्री गोयल यांनी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Cricketnama 2023 : शिवेंद्रराजे, जयकुमार गोरेंच्या बॅटिंगवर फडणवीसांचा विश्वास; सातारचे खेळाडू नागपूर गाजवणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com