Crop insurance office vandalized by Uddhav Thackeray group in Akola Sarkarnama
विदर्भ

Akola Vandalism : पीकविम्याच्या मुद्द्यावर अकोल्यात ठाकरेंचे कार्यकर्ते चिडले; कार्यालय गाठत सर्व साहित्य फोडले

Protest for Farmer : जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्या अन्नत्याग आंदोलनानंतर संताप

जयेश विनायकराव गावंडे

Uddhav Thackeray Group got Angry : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी अकोला येथे अन्नत्यात आंदोलन सुरू केलय. त्यानंतरही पीक विम्याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यानं गुरुवारी (ता. ९) अकोला येथे कार्यकर्त्यांनी एसडीएफसी अॅग्रो या पीकविमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा परिषदेचे नेते तथा उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढं अन्नत्याग आंदोलन सुरू केलय. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी रक्कम न मिळाल्यास विमा कार्यालयं फोडू, असा इशारा आंदोलकांनी दिला होता. त्यानुसार आज त्यांच्या संतापाचा भडका उडालाच. (Uddhav Thackeray Group from Akola Vandalized Agro Insurance Company office in Akola)

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीकविमा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत. आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतरही विमा कंपन्या व प्रशासन कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी कौलखेड भागात असलेले पीकविमा कंपनीचं कार्यालय गाठलं.

इशारा दिल्याप्रमाणं संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. जिल्ह्यातील ३४ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. सुमारे पावणे दोन लाख हेक्टरवरील पिकांचं त्यामुळं नुकसान झालय. अशात २५ टक्के पीकविम्याची अधिसूचना काढूनही शेतकऱ्यांना रक्कम मिळालेली नाही. अतिवृष्टीमुळं कापूस, सोयाबीन, तुरीच्या पिकांचं अतोनात नुकसान झालय. त्यामुळं शेतकऱ्यांना रक्कम का देण्यात येत नाहीये, असा प्रश्न शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं उपस्थित केलाय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे गटाचं शेतकऱ्यांच्याच मुद्द्यावर यापूर्वीही आंदोलन केलं होतं. त्यावेळी योग्य ती कार्यवाही करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं होतं. परंतु कोणतीही रक्कम शेतकऱ्यांना न मिळाल्यानं ठाकरे गट पुन्हा आक्रमक झालाय. आता जोपर्यंत शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागं घेणार नाही, अशा इशारा दातकर यांनी दिलाय. २०२२-२३ मध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची रक्कम हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात यावी, २०२२-२३ मधील खरीप हंगामातील सोयाबीन पीकविम्याबाबत अधिसूचना काढूनही जमा न झालेली रक्कम दिवाळीपूर्वी मिळावी, २०२३-२४ च्या खरीप हंगामात पावसात २१ दिवसांचा खंड पडला. त्यामुळं नियमानुसार एक महिन्याची भरपाईदेखील देण्यात यावी, या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत.

पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्यानं. उत्पादनात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त घट झालीय. या नुकसानीचं सर्वेक्षण करून कापसाला तत्काळ विमालाभ देण्यात यावा, २०२२-२३ मध्ये केळी व संत्र्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळं नियमानुसार व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करावी, अशी मागणीदेखील दातकर यांनी केलीय. ऐन दिवाळीपूर्वी सुरू झालेल्या या आंदोलनामुळं राजकीय वातावरण चांगलच तापलंय. अशात तोडफोड झाल्यानं या आंदोलनाला हिंसक वळण लागणार नाही, यासाठी प्रशासन सतर्क झालय.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT