Akola Shivsena : डावलल्यानं अकोल्यात माजी जिल्हा प्रमुख दुखावले; ठाकरेंना जय महाराष्ट्र करीत शिंदे सेनेत दाखल झाले

Political Setback to Thackeray Group : खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत श्रीरंग पिंजरकरांचा प्रवेश
Shrirang Pinjarkar in Shinde Group
Shrirang Pinjarkar in Shinde GroupSarkarnama
Published on
Updated on

Another Split Varhad : पक्षाकडून सातत्यानं डावलल्या गेल्यानं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अकोला येथील नाराज माजी जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी अखेर उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पिंजरकर यांनी शिंदे सेना झेंडा मंगळवारी (ता. ७) खांद्यावर घेतला. लवकरच पिंजरकर जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळं अकोल्यातील राजकारण आता बदलणार आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख असलेले श्रीरंग पिंजरकर हे अकोला महापालिकेचे उपमहापौरदेखील होते. गेल्या काही दिवसांपासून ते शिंदे गटाच्या संपर्कात होत. त्यामुळं आधीच फूट पडलेल्या अकोला शिवसेनेत आणखी भगदाड पडणार असल्याच्या चर्चांना ऊत आलं होतं. छत्रपती संभाजीनगर येथे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेटही पिंजरकर यांनी घेतली होती. (Former Deputy Mayor of Akola & Uddhav Thackeray Group's leader Shrirang Pinjarkar Joins Eknath Shinde Group)

एकनाथ शिंदे गटाचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक रामेश्वर पवळ यांच्या मदतीनं अखेर पिंजरकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पिंजरकर यांच्यासह बादलसिंग ठाकूर, गजानन पावसाळे, संतोष अनासाने, भिकाराव उजाडे, कुणाल पिंजरकर, पप्पू चौधरी, संदीप पत्की, सुनील इंगळे यांनीही शिंदे गटात प्रवेश केलाय. पिंजरकर यांच्या पक्षांतरामुळं अकोला महापालिकेतील राजकारणावर त्याचा परिणाम दिसणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अकोल्यातही दोन गट तयार झाले होते. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया व त्यांचा गट शिंदे यांच्यासोबत गेला. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख व पदाधिकारी ठाकरे गटासोबत राहिले.

श्रीरंज पिंजरकर यांच्याबाबतही पक्षात दुजाभाव होत होता असा आरोप आहे. आमदार नितीन देशमुख आणि श्रीरंग पिंजरकर यांच्यात मध्यंतरीच्या काळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडल्या होत्या. त्यामुळं पिंजरकर हे ठाकरे गटाला सोडतील, असं सांगण्यात येत होतं. ठाकरे गटाचे नेतेही याच क्षणाच्या प्रतीक्षेत होते. अखेर तो मुहूर्त पिंजरकर यांनी मंगळवारी साधला. पक्षात वरिष्ठस्तरावरून डावललं जात होतं. आपण अकोल्यातील शिवसेनेसाठी योगदान दिलं. गेल्या ३८ वर्षांपासून आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलो. परंतु पक्षातील नेत्यांची योग्य वागणूक दिली नाही, असं पिंजरकर ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अकोल्यातील उद्धव ठाकरे गटाचं पहिलं लक्ष्य भाजप आहे. राज्यात सत्तांतर झालं तेव्हापासून अकोल्यातील ठाकरे गट विरुद्ध भाजप हा सामना खूपच आक्रमक झालाय. एकनाथ शिंदे गटावर अद्यापही ठाकरे सेनेनं पाहिजे तसं लक्ष केंद्रित केलेलं नाही. ठाकरे गटातील अनेक नेत्यांचं अद्यापही तळ्यात-मळ्यात असं सुरू आहे. एखादं मोठं लाभाचं पद मिळालं तर आगामी निवडणुकीपूर्वी अकोल्यातील ठाकरे गटात आणखी फूट पडण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनं ठाकरे गटातील काही जण शिंदे गटातील नेत्यांच्या थेट संपर्कात आहेत. लवकरच याबाबतचं चित्र स्पष्ट होण्याचे संकेत आहेत.

Edited by : Prasannaa Jakate

Shrirang Pinjarkar in Shinde Group
Thackeray Group in Akola : जिल्हा प्रमुखानं अन्न सोडलं; शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर प्रशासनाला घेरलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com