Buldana Samruddhi Mahamarg Accident Sarkarnama
विदर्भ

Samrudhhi Mahamarg Accident : बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत..

Buldana Samruddhi Mahamarg Accident : सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत..

सरकारनामा ब्युरो़

Buldana Bus Accident : समृद्धी महामार्गावर शनिवारी (1 जुलै) एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये 25 जण जागीच जळून ठार झाले आहेत, तर आठ जण जखमी आहेत. या घटनेवर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदींनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. (Samrudhhi Mahamarg Accident)

बस उलटल्यानंतर काही मिनिटांतच तिने पेट घेतला. त्यानंतर स्फोट होऊन संपूर्ण बस जळाली. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस कारंजा येथे जेवणासाठी थांबली होती. त्यानंतर कारंजाजवळ असलेल्या इंटरचेंजवरुन समृद्धी महामार्गावर पुण्याला (Pune) जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती.

अपघातावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. "बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत," असे ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

"बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात २५ जणांचा दुर्दैवी अंत झाला. हे वृत मन हेलावणारे आहे.गेल्या वर्ष भरात या महामार्गावर असे अपघात सुरूच आहेत. आता पर्यंत 300 हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले. सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत," असा आरोप ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.

समुद्धी महामार्गावरील हा सर्वात मोठा अपघात आहे. या बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. " झालेली घटना दुदैवी आहे, या घटनेत २५ जणांना मृत्यू झाला आहे. गंभीर प्रवाशांच्या उपचार सरकार करणार आहे. मृत्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

या अपघाताविषयी माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी 'रोड कन्सट्र्क्शन' हे समृद्धी महामार्ग वरील बसच्या अपघाताचे कारण नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मानवी चूका किंवा वाहनांमधील बिघाडामुळे हे अपघात होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याबाबत भविष्यात चालकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT