BMC Covid Scam : जयस्वाल यांच्यानंतर आता ED च्या रडारवर इकबालसिंह चहल ; नेत्यांचीही नावे समोर येणार..

Covid Scam : संशयाची सुई आयुक्त चहल आणि अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांच्यावर देखील आहे
ED, BMC
ED, BMC Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : कोविड सेंटरचे कंत्राट लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसला देण्यात आले. या कंत्राटाचे 22 कोटी रुपयांचा शेल कंपन्यांद्वारे गैरव्यवहार करण्यात आल्याचे ईडी तपासात समोर आले असल्याचे सांगण्यात येते. या गैरव्यवहारात आता ईडीच्या रडारवर मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल असल्याचे दिसते.

मुंबई महापालिकेच्या कथित जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याच्या चौकशी सध्या सुरु आहे. या तपासाचे चक्र वेगानं फिरत असून या प्रकरणाच्या खर्चाचा संपूर्ण तपशील ईडीला पाहिजे आहे. त्यासाठी त्यांनी आयुक्त इकबालसिंह चहल यांना पत्र पाठवले आहे.

ED, BMC
Samrudhhi Mahamarg Accident : होरपळून २५ प्रवाशांचा मृत्यू ; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, मुख्यमंत्री म्हणाले..

कोरोना काळात त्यांच्याच देखरेखीखाली कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले. त्या काळातील कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांचे निर्णय आयुक्त चहल आणि अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी घेतले. त्यामुळे यात चहल, वेलरासू यांच्यासह शासकीय अधिकारी, नेते मंडळींची नावे समोर येण्याची शक्यता आहे.

संशयाची सुई आयुक्त चहल आणि अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांच्यावर देखील आहे. त्यातच आता ईडीने आयुक्त चहल यांना पत्र पाठवून या सर्व खर्चांचा तपशील मागितला आहे.

कोविडकाळात मध्यवर्ती खरेदी केंद्रामार्फत कोरोनाविषयक औषधे आणि उपकरणांसाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. या केंद्रामार्फत वर्षाला 7 ते 8 हजार कोटी रुपयांची खरेदी केली जाते. या खरेदी केंद्राची पूर्ण जबाबदारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

ED, BMC
Raju Patil's Video Viral: कल्याण लोकसभा श्रीकांत शिंदेंच लढणार, फडणवीसांच्या विधानानंतर मनसे आमदाराचा 'तो' Video व्हायरल..

महापालिकेने लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या सेवा आणि साहित्यासाठी दिलेल्या 32 कोटी रुपयांपैकी सुमारे 22 कोटी रुपयांचे शेल कंपन्यांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग करण्यात आले, असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसला मुंबई महापालिकेने जम्बो कोविड सेंटर चालवण्याचे कंत्राट दिले होते. यासंदर्भातील 3 जुलै 2020 रोजीच्या पत्रावर आयुक्त चहल आणि तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

प्रकरणी ईडीने आधीच काही ठिकाणी छापेमारी केली असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती सुजीत पाटकर, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे जवळचे सहकारी सूरज चव्हाण आणि सनदी अधिकारी संजीव जयस्वाल ईडीच्या रडावर आहेत. यापैकी सूरज चव्हाण आणि संजीव जयस्वाल यांची चौकशी सुरू आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com