Thackeray Group Morcha : ठाकरे गटाच्या मोर्चापूर्वीच सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियानचे बॅनर झळकले ; भाजपकडून 'चोर मचाए शोर'..

Municipal Corporation of Mumbai : मुंबईतील दोन मोर्च्यांनी राजकारण तापलं..
Thackeray Group Morcha
Thackeray Group MorchaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज (शनिवारी) मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी ठाकरे गटाने परवानगी मागितल्यानंतर कायदा सुव्यस्थेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण मोर्चाचा मार्ग बदलल्यानंतर मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली आहे.

या मोर्चापूर्वी मुंबई महानगरपालिका आणि मोर्चाच्या परिसरामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान याचे बॅनर झळकले आहेत. त्यांनी न्याय द्या असे बॅनरवर लिहिल आहे. या बॅनरमुळे मोर्चा निघण्याच्यापूर्वी मुंबईतील राजकारण तापलं आहे. या मोर्चाचे नेतृत्व आदित्य ठाकरे करणार आहेत. मरीन लाईन्सपासून ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे.

Thackeray Group Morcha
Ahmednagar : राष्ट्रवादीच्या दबावामुळे कारवाई नाही, भाजप सरचिटणीसांची फडणवीसांकडे तक्रार.

महापालिका मुख्यालयावर धडकणाऱ्या ठाकरे गटाच्या या मोर्चाच्या शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. रस्ते काँक्रिटीकरण घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा किंवा खडी घोटाळा याबाबतच्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात आला आहे.मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे गटाकडून शनिवारी मुंबई महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याआधी या आशयाचे बॅनर लागल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांनी सुशांत सिंग राजपुतला न्याय द्या अशी मागणी केली आहे. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत असे देखील या बॅनरमध्ये लिहण्यात आले आहे.

Thackeray Group Morcha
BMC Covid Scam : जयस्वाल यांच्यानंतर आता ED च्या रडारवर इकबालसिंह चहल ; नेत्यांचीही नावे समोर येणार..

ठाकरे गटाच्या या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपच्या वतीने देखील विविध ठिकाणी प्रति मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजपच्या वतीने काढण्यात येणार असलेल्या मोर्चाला 'चोर मचाए शोर' अशी टॅग लाईन देण्यात आली आहे. दुपारी चार वाजता भाजपच्या पक्ष कार्यालयापासून नरीमन पॉईंट असा मोर्चा भाजपच्या वतीने काढण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्या प्रकरणी राज्य सरकारने एसआयटी नेमली. त्यावरुन ठाकरे गटाला मिरची का झोंबली, असा खोचक सवालही भाजपकडून विचारण्यात येत आहे.

त्यामुळे आज मुंबईत प्रमुख पक्षांचे दोन वेगवेगळे मोर्चे मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसते.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com