Amravati : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दोन दिवसीय विदर्भ दौरा केला. यावेळी त्यांनी भाजपसह शिंदेगटावरही सडकून टीका केली. या विदर्भ दौऱ्यात त्यांच्या निशाण्यावर प्रामुख्याने शिंदेंसोबत गेलेले खासदार भावना गवळी, आमदार व मंत्री संजय राठोड यांच्यासह देवेंद्र फडणवीस हे होते. पण हा विदर्भ दौरा आटोपत नाहीतोच उध्दव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी कंबर कसली आहे.याचाच भाग म्हणून ठाकरे हे गेल्या दोन दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर होते. वाशिम, यवतमाळ येथे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या बैठका घेत ठाकरेंनी अमरावतीत रविवारी रात्री मुक्काम केला होता. मात्र, अमरावतीतील कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन ठाकरे नागपूरमध्ये रवाना होत नाही तोच जिल्हाप्रमुखासह शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटा(Shinde Shivsena) त प्रवेश केला आहे.
उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोमवारी(दि.१०) अमरावती येथे भाजपवर हल्लाबोल केला होता. ते म्हणाले, जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवून घेणाऱ्यांना दुसऱ्याचे पक्ष फोडावे लागत आहे. देशातील सर्व विकून दुसऱ्या पक्षांतील लोकांना विकत घेण्याची भाजपवर का वेळ आली? हातात सर्व यंत्रणा असतानाही भाजपला जिंकून येण्याचा आत्मविश्वास राहिला नाही. यातून विरोधकांना संपवण्याचा डाव भाजपचा असल्याचा आरोप करून भाजप हा राजकारणातील नामर्द पक्ष असल्याचा हल्लाबोल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
खासदार ताई पळाल्याच होत्या, पण...
यवतमाळ येथील सभेत उध्दव ठाकरे यांनी खासदार भावना गवळी(Bhavna Gawali) यांच्यासह संजय राठोडांवर निशाणा साधला होता. ठाकरे म्हणाले, आमदार आणि खासदार दोघांवर आरोप झाले. आपल्या खासदार ताई तर पळाल्याच होत्या. पण, एकदिवशी फोटो आला, पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधताना. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला आपला देश आहे. मात्र, अख्ख्या देशात तुमच्याच पक्षातील काही दलालांनी आरोप होते की, या खासदार भ्रष्ट आहेत. त्यांच्याच हातून पंतप्रधानांनी राखी बांधून घेतली. पुढे चौकशीचं काय झालं?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला होता.
दोनशे रुपये हप्ते घेणाऱ्यांना मंत्री कुणी केलं ?
हा महाराष्ट्र साधूसंतांचा, दगडांचा, विरांचा आणि सूरांचा आहे. त्या महाराष्ट्राची ओळख आज जगामध्ये यांच्यामुळे गद्दारांचं आणि लाचारांचं महाराष्ट्र होतोय. परंतु हे आम्ही कदापि होऊन देणार नाही. मी आई जगदंबेला साकडं घातलंय की, या राजकारण्यांमधली सर्व गद्दारी जाऊ दे. अंबादास दानवे म्हणाले की, दोनशे रुपये हप्ते घेणाऱ्यांना मंत्री कुणी केलं? परंतु ते तेव्हा हप्ते घेत होते, हे मला माहिती नव्हतं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्यावर हल्लाबोल केला.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.