-पांडुरंग बर्गे
Mahesh Shinde News : कोरेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही रस्ते, साधी गटार नाहीत. एका गावात मध्यंतरी १४० रुग्ण डेंगीचे आढळले. उपचारासाठी एकाला किमान ४० हजार खर्च धरला तर किती झाले बघा. मग मला प्रश्न पडतो की दमदार आमदार..!, कुठला वाघ आला रे..! म्हणवून घेणाऱ्यांनी नेमके केले काय, असा प्रश्न उपस्थित करुन काही कामे तर केवळ कागदावर झाली असून काही गावांचे रस्तेच सापडत नाहीत, अशी टीकाही आमदार महेश शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा नामोल्लेख टाळून केली.
कठापूर (ता. कोरेगाव) Koregaon येथे सुमारे १८ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभात आमदार महेश शिंदे Mahesh Shinde बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल बर्गे, भारतीय जनता पक्षाचे कोरेगाव तालुकाध्यक्ष संतोष जाधव, शिवसनेचे कोरेगाव तालुकाप्रमुख संजय काटकर, कोरेगाव पंचायत समितीचे माजी सदस्य नवनाथ केंजळे, प्रल्हाद केंजळे, इसाक सुतार, अधिक केंजळे, दीपक केंजळे, श्रीरंग सापते आदी उपस्थित होते.
माझे मतदारसंघात फिरताना सतत प्रामुख्याने शेती, रस्त्यांकडे सतत लक्ष असते. कठापूरकरांची रस्त्यांची समस्या लक्षात घेऊन मी एम ४० पद्धतीचे रस्ते प्रथमच हाती घेतलेले आहेत. त्यासाठी निधी दिला आहे, अजून कमी पडला तर देणार आहे. हे गाव सुसंस्कृत व विकासाला साथ देणारे असल्याने आपले या गावाकडे कायम लक्ष राहील."
आमदार महेश शिंदे म्हणाले, तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही रस्ते, साधी गटार नाहीत. एका गावात मध्यंतरी १४० रुग्ण डेंगीचे आढळले. उपचारासाठी एकाला किमान ४० हजार खर्च धरला तर किती झाले0 बघा. मग मला प्रश्न पडतो दमदार आमदार..!, कुठला वाघ आला रे..! म्हनवून घेणाऱ्यांनी नेमके केले काय0 काही कामे तर केवळ कागदावर झालेली आहेत.
त्यामध्ये काही गावाचे रस्ते सापडत नाहीत. तब्बल सहा गावांत तर आम्ही सभामंडप शोधतोय. मात्र, ते सापडत नाहीत. आता चोरी झाली म्हणून पोलिसात तक्रार करायची उरली आहे, असेही आमदार शिंदे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.