Buldhana News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या असून मतदारसंघनिहाय आढावा घेण्यावर नेत्यांनी भर दिला आहे. सर्वच राजकीय पक्ष आपल्या पक्षाची मोर्चेबांधणी करत आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाकडूनही लोकसभेसाठी रणनीती आखण्यात येत असून ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा उद्धव ठाकरे घेत आहेत.
उद्धव ठाकरे स्वत: लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत असून 'मिशन लोकसभा' यशस्वी करण्यासाठी शिवसैनिकांना महत्वाच्या सूचना देखील ते देत आहेत. ठाकरेंनी मंगळवारी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.
शिंदे गटाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना आगामी निवडणुकीत धडा शिकवण्यासाठी आणि आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना थेट रणनीती सांगत 'फिल्डींग' लावल्याचीही चर्चा आहे.
'इंडिया आघाडी' मध्ये बुलडाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे असून आपण ही जागा लढवणार आहोत, असे आश्वासन देत शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या प्रतापराव जाधवांचा पराभव करण्यासाठी आपला (ठाकरे गट) उमेदवार निवडून आणा, असे आदेश ठाकरेंनी बुलडाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची (ठाकरे गट) ताकद आणखी वाढवण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश देत विधानसभा मतदारसंघात देखील जिथे भाजपचा उमेदवार उभा राहील, तेथे त्यांचा पराभव करण्याची रणनीती आतापासूनच तयार करा आणि तयारीला लागा, अशा सूचना ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.