Shivsainik Meet Uddhav Thackeray: ठाकरे गटाचं मिशन लोकसभा; उद्धव ठाकरेंकडून मतदारसंघनिहाय बैठकांचा धडाका

Shivsena Uddhav Thackeray : ४८ लोकसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून चाचपणी
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रमावस्था असतानाच आता ठाकरे गट आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी ठाकरे गटाने बैठकांना सुरुवात केली असून उद्धव ठाकरे स्वत: मतदारसंघाचा आढावा घेत आहेत.

अहमदनगर आणि नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक गुरुवारी दुपारी पार पडणार आहे. तर बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या विरोधात लढण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत.

Uddhav Thackeray
Loksabha Election BJP Masterplan: आगामी निवडणुकीपूर्वी भाजपचा 'मास्टर प्लॅन'; 350 आमदारांना दिले जाणार विशेष ट्रेनिंग

लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीला त्या-त्या मतदारसंघातील शिवसेनेचे (ठाकरे गट) संपर्क नेते, स्थानिक उपनेते, जिल्हासंपर्कप्रमुख, स्थानिक विभागीय महिला संघटीका, जिल्हाप्रमुख, खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख शहरप्रमुख (प्रमुख शहरातील), विधानसभाप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख (मुंबई) या बैठकांना उपस्थित राहणार आहेत.

Uddhav Thackeray
Sharad Pawar Rally In Beed : कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या.. ; शरद पवारांची तोफ धडाडण्यापूर्वीच मुंडे समर्थकांकडून बॅनरबाजी

उद्धव ठाकरे यांच्याकडून ४८ लोकसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी सुरु केल्यामुळे त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच शरद पवार आणि अजितदादांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रमावस्था असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेस आणि ठाकरे गटाने पवारांना वगळून आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी सुरु केल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, या सर्व चर्चा शरद पवारांनी फेटाळून लावल्या असल्या तरी दुसरीकडे ठाकरे गटाने लोकसभा मतदारसंघनिहाय सुरू केलेल्या आढावा बैठकांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com