Shivsena UBT; Uddhav Thackeray sarkarnama
विदर्भ

Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेत वादाचा भडका: पदावरून गच्छंती होताच जिल्हाप्रमुखाकडून कार्यालयात राडा

Shivsena UBT Gadchiroli leadership change Controversy : राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकींची रणधुमाळी पाहायला मिळत असून महायुतीला पाच ठिकाणी बिनविरोध असे यश मिळाले आहे.

Aslam Shanedivan

Gadchiroli Uddhav Thackeray Shivsena Internal Conflict News : राज्यात एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. विधान परीषदेच्या निवडणुकीत माघारी नाट्याने ठाकरेंच्या शिवसेनेची नाचक्की झाली असतानाच आता 7 खासदार फुटण्याची शक्यता आहे. हे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा असून पक्षाची पडझड रोखण्यासाठी ठाकरेंनी आज (ता.14) मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे.

एकीकडे या बैठकीत काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेकडून गडचिरोली आणि आरमोरी विधानसभेसाठी नव्या जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या नियुक्त्यांवरून आता पक्षातंर्गत संघर्ष उफाळला आला.

गडचिरोली जिल्हाप्रमुखाने पक्षाचेच कार्यालय फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यापेक्षाही धक्कादायक म्हणजे या जिल्हाप्रमुखाने कार्यालयातील टेबल, खुर्च्या, पंखे, एसी आणि अगदी बल्बसुद्धा काढून नेले आहेत. यामुळे येथे खळबळ उडाली असून शिवसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

एकीकडे शिवसेनेची पडझड होत असतानाच ठाकरेंकडून पक्ष बांधणीकडे लक्ष दिले जात आहे. दरम्यान दोन विधानसभा मतदारसंघात नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करत ठाकरेंनी भाकरी फिरवली आहे. पवन गेडाम यांच्याकडे गडचिरोली आणि आरमोरी तर अहेरी विधानसभेसाठी दिलीप सुरपाम यांची जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

मात्र या नव्या नियुक्त्यांनंतर नवा वाद सुरू झाला असून गडचिरोलीचे माजी जिल्हाध्यक्ष वासुदेव शेडमाके यांनी आपल्याला डावलल्याची नाराजी व्यक्त केली आहे. फक्त नाराजीच व्यक्त केली नाही तर त्यांच्या नाराजीचा उद्रेक झाला. यावेळी शेडमाके यांनी पदावरून गच्छंती होताच पक्ष कार्यालयातच तोडफोड केली आहे. कार्यालयातील पीओपी फोडत टेबल, खुर्च्या, पंखे, एसी आणि अगदी बल्बसुद्धा शेडमाके यांनी काढून नेले.

दरम्यान एकीकडे नव्या नियुक्त्यांमुळे संघटनात्मक बदल केला जात असतानाच दुसरीकडे पक्ष कार्यालयातील तोडफोड करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हाप्रमुख पदासाठी नव्या नियुक्त्या जाहीर होताच हा वाद उफाळला असून माजी जिल्हाप्रमुखाने आपल्याला डावलल्याच्या नाराजीतून कार्यालयात राडा करत साहित्य काढून नेले.

यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून हा वाद पक्ष नेतृत्व मिटवरणार की कोणती वेगळी भूमिका घेणार? की संबंधितांवर कारवाई करणार याकडे जिल्ह्यातील शिवसेनेसह राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT