Amit Shah Devendra Fadnavis Uddhav Thackeray.jpg Sarkarnama
विदर्भ

Uddhav Thackeray News: भाजपचा वार जिव्हारी; उद्धव ठाकरेंनी नागपुरात जाऊन शाह अन् फडणवीसांचा हिशेब चुकता केला; म्हणाले...

Uddhav Thackeray Press Conference: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थिती लावत महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारच नव्हे,तर गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला.

Deepak Kulkarni

Nagpur News: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.अमित शहांनी संसदेत निवडणुकीतील सुधारणांवर बोलताना विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही लक्ष्य केले.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच, केवळ मतपेढीच्या राजकारणासाठी (व्होट बँक) एका न्यायाधीशांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणला जात असून सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे उद्धव ठाकरेंनीही या महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याचं टीकास्त्र शहांनी डागलं होतं. त्यानंतर कोण होतास तू,काय झालास तू.. अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर केली होती. हीच टीका जिव्हारी लागलेल्या ठाकरेंनी नागपुरात जाऊन शाह आणि फडणवीसांचा हिशेब चुकता केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी(ता.11) नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थिती लावत शिवसेना आमदार व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतानाच महत्त्वाची पत्रकार परिषदही घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारच नव्हे,तर गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले, मला मुख्यमंत्र्यांची दया येते की, कोण होतास तू काय झालास तू,एवढ्या सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना जवळ घेतलंस तू,स्वत:च्या पांघरुणात घेतलंस तू,काय होतास तू काय झालास तू, भ्रष्टाचाऱ्यांना पांघरुणात घेतलंस तू असा खोचक पलटवार त्यांनी फडणवीसांवर केला. यावेळी त्यांनी ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचंही म्हटलं.

नागपूरच्या अधिवेशनातून विदर्भाला काय मिळालं? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, अमित शाह खूप हिंदुत्ववादी आहेत,त्यांनी मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही.संघांनी तर मला शिकवूच नये,वंदे मातरमची तुम्ही चर्चा करताय,असा उपरोधिक टोलाही शहांना आणि संघाला लगावला.

उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना (Amit Shah) फटकारतानाच तुमच्या मंत्रिमंडळातले मंत्री किरण रिजिजू मी गोमांस खातो असं म्हणतात. 9 डिसेंबरचा हा फोटो आहे, त्यांच्यासोबत ते जेवण करत आहेत. तुम्ही हिंदुत्ववादी म्हणताय मग गोमांस खाणाऱ्या मंत्र्याचा तुम्ही राजीनामा घेणार का? असा संतप्त सवालही ठाकरेंनी शहांना केला.

तसेच आम्ही न्यायाधीशांविरोधात महाभियोग आणला.कारण,त्यांची आतापर्यंतची कारकीर्द वादग्रस्त असल्याची भूमिका स्पष्ट करतानाच त्यांनी अमित शाह यांच्या टीकेचाही समाचार घेतला. माझ्यावर बोलण्याआधी तुम्ही तुमच्या बुडाखालचं हिंदुत्व बघावं असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी थेट जय शाह यांच्यावरुन अमित शहांना लक्ष्य केलं.

ते म्हणाले,अमित शाहांचा मुलगा जय शाह पाकिस्तानसोबत भारताला खेळायला लावतो.आता तुम्ही सांगा? जय शाह हिंदुत्ववादी नाही म्हणून तो पाकिस्तानसोबत खेळायला लावता का? अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT